नाशिक : हॉटेलमध्ये धिंगाणा घालणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन; खात्यांतर्गत चौकशीही होणार
स्थानिक बातम्या

नाशिक : हॉटेलमध्ये धिंगाणा घालणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन; खात्यांतर्गत चौकशीही होणार

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नवीन नाशिक । प्रतिनिधी

लेखानगर येथील स्पॅक्स बारमध्ये मित्राच्या मदतीने हॉटेल व्यवस्थापकास धमकी देत मारहाण करणार्‍या पोलीस सेवकावर आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी निलंबनाची कारवाई केली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, दिनांक 1 फेब्रुवारी रोजी रात्रीच्या वेळी लेखानगर येथील स्पॅक्स बारमध्ये पोलीस सेवक भगवान जाधव व नुकताच तडीपारीतुन मुक्तता झालेला कुख्यात पप्पू कांबळे या दोघांनी शिरकाव करून एक मद्याची बाटली व पाण्याची बाटली येथील व्यवस्थापक भास्कर शेट्टी यांच्याकडे मागितली होती.

त्यानंतर शेट्टी यांनी बिलाबाबत त्यांना विचारणा केली. यावेळी या पोलिसाने ‘मी पोलिस कर्मचारी असल्याचे जाधव यांनी सांगितले व पोलिस असल्याचे ओळखपत्र दाखवून तू मला ओळखत नाहीस का? असे सांगून दम भरला होता. त्याउपर त्यांनी व्यवस्थापकाला शिवीगाळ करत मारहाण केली होती.

यासंदर्भात संबंधित तक्रारदार अंबड पोलीस ठाणे येथे तक्रार नोंदण्यासाठी गेल्या असता तेथे उपस्थित पोलीस कर्मचार्‍यांनी सदर प्रकरणाची तक्रार घेण्यास नकार दिला.

परंतु त्यांच्यासमवेत असलेल्या काही जणांनी पोलीस उपायुक्त यांच्या कानावर संबंधी प्रकार कथन केला. यासंदर्भात पोलीस उपायुक्तांनी उपस्थित पोलीस सेवकास तक्रार नोंदवण्याचे फर्मान दिले.

त्यामुळे संबंधित पोलिस सेवकाने अदखलपात्र गुन्हा दाखल करून घेतला होता. या संदर्भात आता पोलीस आयुक्त व पोलीस उपायुक्त काय निर्णय घेतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या प्रकरणाची गांभिर्याने दखल घेत पोलीस आयुक्त नांगरे पाट:ील यांनी जाधव यांचे तात्काळ निलंबन करीत सदर प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश दिले.

जाधवची होणार खात्यांतर्गत चौकशी

जाधव हे वैद्यकीय रजेवर होते. ते रजेवर जरी असले तरी एक शिस्तबद्ध खात्यामध्ये काम करतात. त्यांचे वर्तन हे बेशिस्तपणाचे असल्याने पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी तात्काळ त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. निलंबन काळात त्यांची खात्याअंतर्गत चौकशी करण्यात येणार आहे.

– पौर्णिमा चौघुले (पोलीस उपायुक्त)

Deshdoot
www.deshdoot.com