नाशिक : चोरट्यांनी पोलिसाचीच दुचाकी पळवली; पोलीस उपायुक्त कार्यालयातील प्रकार
स्थानिक बातम्या

नाशिक : चोरट्यांनी पोलिसाचीच दुचाकी पळवली; पोलीस उपायुक्त कार्यालयातील प्रकार

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक| शहरात दुचाकी चोरीचे सत्र सुरूच असून यामुळे नागरीक हैराणा आहेत. आता तर पोलीस उपायुक्त कार्यालयाच्या आवारातूनच पोलीसाचीच गाडी चोरीला गेल्याने वाहन चोरट्यांनी थेट पोलीसांनाच आव्हान दिले आहे.

या प्रकरणी पोलीस शिपाई सलीम शेख (नेमणुक मुंबईनाका पोलीस ठाणे) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार १५ मे रोजी रात्री ९ वाजता शेख हे शरणपुर रोड येथील एचडीएफसी हाऊस समोरील सिग्नल परिसरात कर्तव्यासाठी आले होते.

त्यांनी त्यांची दुचाकी (एमएच १५, जीजे ७२६३) ही जवळील परिमंडळ १ च्या पोलीस उपायुक्त कार्यालयाच्या आवारात पार्क केली होती. कर्तव्य करून ते सकाळी ८ वाजता घरी जाण्यासाठी निघाले असता त्यांची दुचाकी गायब असल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com