देशदूत संगे… कुटूंब रंगे…; कुटुंबातील सर्वांसाठी…अनोखी ऑनलाईन स्पर्धा
स्थानिक बातम्या

देशदूत संगे… कुटूंब रंगे…; कुटुंबातील सर्वांसाठी…अनोखी ऑनलाईन स्पर्धा

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक | प्रतिनिधी 

सध्या लॉकडाऊनचा काळ आहे….आपण घरात राहिलो तरच करोना उंबऱ्या बाहेर राहील अशी स्थिती आहे. त्यामुळे घरीच रहा, सुरक्षित रहा. या सक्तीच्या सुटीच्या काळात मेंदूला चालना देण्यासाठी देशदूत सादर करीत आहे देशदूत संगे, कुटूंब रंगे ही ऑनलाईन स्पर्धा! यात आहे चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा आणि टिकटॉक व्हिडीओ स्पर्धा. प्रत्येक घरासाठी आणि घरातल्या प्रत्येकासाठी… प्रत्येकी 3 गट आणि आकर्षक बक्षिसेही! चित्र काढा, निबंध लिहा किंवा व्हिडिओ बनवा आणि पाठवा आमच्या http://mh15.com/contest/ या वेबसाईटवर!

प्रवेश शुल्क रु 20 मात्र! *प्रवेशिका पाठविण्याची अंतिम* *मुदत दि 27 मे 2020.* चला तर मग स्पर्धेत भाग घेऊ या… आकर्षक बक्षिसे जिंकू या… प्रत्येक गटात प्रथम रु 1000, द्वितीय रु 500, तृतीय रु 250 व 10 उत्तेजनार्थ बक्षिसे दिली जातील. प्रत्येकाला डिजीटल सहभाग प्रमाणपत्र पाठविले जाईल.

चित्रकला स्पर्धा

वयोगट : 5 ते 10 वर्षे
विषय : 1) सूर्योदय, 2) मंदिर
3) माझे कुटुंब
वयोगट : 11 ते 18 व त्यावरील
विषय : 1) निसर्ग चित्र, 2) लॉक डाऊन काळातील निर्मनुष्य रस्ते, 3) कोरोना पासून सावधानता

निबंध स्पर्धा 

वयोगट : 5 ते 10 (400 शब्दांपर्यंत.)
विषय : 1) माझी शाळा, 2) माझी आई, 3) लॉकडाऊन काळातील गमतीजमती
वयोगट : 11 ते 18 व त्यावरील ( 800 शब्द)
विषय : 1) करोनाने मला काय शिकविले? 2) करोना नंतरचे जग 3) माझा लॉकडाऊन

टिकटॉक व्हिडिओ स्पर्धा

ही स्पर्धा सर्व वयोगटासाठी आहे. रस्त्यावर थुंकू नये, वाहतुकीचे नियम पाळावे, रांगेत उभे रहावे, अन्न, पाण्याची नासाडी करू नये यासारखे सामाजिक भान जपणारे विषय तसेच लॉकडाऊन काळातील गमतीजमती यावर आधारित 60 सेकंदापर्यंतचा व्हिडीओ करावा. हा व्हिडिओ टिकटॉक किंवा युट्युबवर अपलोड करून त्याची लिंक स्पर्धेच्या वेबसाईटवर टाकायची आहे. (व्हिडीओ अपलोड करू नये)

दिलेल्या विषयांपैकी एक चित्र काढून व रंगवून झाल्यावर त्याचा फोटो काढावा, चित्र हातात घेऊन एक सेल्फी काढावा. एका विषयावरील निबंध लिहून झाल्यावर त्याचा फोटो काढावा.  चित्र, निबंध व व्हिडीओची लिंक http://mh15.com/contest/ या वेबसाईटवर पाठवावी.

नियम व अटी 

1) चित्र, निबंध व व्हिडीओ लिंक http://mh15.com/contest/ या वेबसाईटवर पाठवावी.
2) चित्र, निबंध व व्हिडीओ लिंक (आवाजासह) सुस्पष्ट असावेत अन्यथा बक्षिसासाठी विचार केला जाणार नाही.
3) चित्र, निबंध व व्हिडीओ करतांना कोणाच्याही सामाजिक, धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाही याची दक्षता घ्यावी.
4) परिक्षकांकडून परिक्षण केल्यानंतर सर्वोत्कृष्ट कलाकृतीची निवड केली जाईल. परिक्षकांचा निर्णय अंतिम असेल.
5) स्पर्धेबाबत कोणतेही फेरबदल करण्याचे अधिकार आम्ही राखून ठेवले आहेत.
6) स्पर्धकाने भरलेले प्रवेश शुल्क कोणत्याही कारणास्तव परत केले जाणार नाही.
7) स्पर्धकाने कोणत्याही कॉपीराईट वा पेटंटचे उल्लंघन करु नये, याची सर्वस्वी जबादारी स्पर्धकाची असेल.
8) 18 वर्षाखाली मुले, मुलींनी व्हिडीओ करतांना पालकांच्या मार्गदर्शनाखालीच करावेत.
9) चित्र, निबंधावर नाव, वयोगट व मोबाईल क्रमांक असावा, व्हिडीओच्या सुरुवातीला नाव, वयोगट व मोबाईल क्रमांकाचा उल्लेख करावा.
10) 20 रु प्रवेश शुल्क एका स्पर्धेसाठी आहे, स्वतंत्र प्रवेश शुल्क व नोंदणी करुन एकापेक्षा जास्त स्पर्धेत सहभागी होता येईल.
11) नाशिक न्यायकक्षेच्या अधीन

(अधिक माहितीसाठी संपर्क : 7387151319)

Deshdoot
www.deshdoot.com