डहाणू नाशिक रस्त्यावर वऱ्हाडाच्या पिकअपला अपघात; एक ठार, २० ते २५ वऱ्हाडी जखमी
स्थानिक बातम्या

डहाणू नाशिक रस्त्यावर वऱ्हाडाच्या पिकअपला अपघात; एक ठार, २० ते २५ वऱ्हाडी जखमी

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

पालघर : डहाणू-नाशिक मार्गावर वेती येथे लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या पिकअप वाहनाला अपघात झाला. अपघातात एका वऱ्हाडीचा मृत्यू झाला तर जवळपास २०-२५ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींवर उपचार सुरु असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

अधिक माहिती अशी की, डहाणूजवळ वेती या गावी लग्नाचे वऱ्हाड घेऊन पिकअप वाहन चालले होते. याच वेळी चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला.

या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून २० ते २५ वऱ्हाडी गंभीर जखमी झाले आहेत. पिकअप वाहनात जवळपास  ४० वऱ्हाडी प्रवास करत होते.

जखमींवर कासा येथील उपजिल्हा रुग्णायलात उपचार सुरू आहेत. तर जखमींपैकी 5 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अपघातातील एका गंभीर जखमीला गुजरातमधील वलसाड येथील रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आल्याचे समजते.

Deshdoot
www.deshdoot.com