जि.प.पदाधिकाऱ्यांनी घरातूनच हाकला जि.प. चा कारभार
स्थानिक बातम्या

जि.प.पदाधिकाऱ्यांनी घरातूनच हाकला जि.प. चा कारभार

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक । प्रतिनिधी

करोना विषाणूच्या संसर्गाचा प्रादुर्भाव पसरू नये,यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहेत.जिल्हा परिषद सदस्य,पंचायत समिती सदस्य व सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांनी नाशिक जिल्हा मुख्यालय, पंचायत समिती मुख्यालय व ग्रामपंचायत कार्यालय येथे जाणे  टाळावे व इतरांनाही याबाबत प्रवृत्त करावे,असे आवाहन केले होते. या आवाहानास प्रतिसाद देत, अध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांनी सोमवारी (दि.२३) घरी राहूनच कामकाज केले.

अध्यक्ष क्षिरसागर यांनी निफाड पंचायत समितीत जाऊन, उपाययोजनांची माहिती घेतली. तसेच ग्रामपंचायतींना भेटी दिल्या.उपाध्यक्ष डॉ. सयाजी गायकवाड यांनी चांदवड तालुक्यातील उसवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात रूग्ण कल्याण समितीची बैठक घेतली.

तसेच तालुक्यातील ग्रामपंचायतींना भेटी देत, ग्रामपंचायतींनी कोरोनाचे प्रबोधन करावे जनजागृती करावी अशा सूचना केल्या. सभापती संजय बनकर, अश्विनी आहेर, सुरेखा दराडे यांनी घरी थांबून कामकाज करत कोणत्याही अभ्यासगंताच्या भेटी घेतल्या नाहीत.

Deshdoot
www.deshdoot.com