पंचवटी : रामवाडीत दिराने केला भावजयीचा खून; भावावरही वार
स्थानिक बातम्या

पंचवटी : रामवाडीत दिराने केला भावजयीचा खून; भावावरही वार

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

पंचवटी | प्रतिनिधी 

नाशिक शहर पुन्हा एकदा खूनाच्या घटनेने हादरले आहे. पंचवटीतील रामवाडी परिसरात दिरानेचे भावजयीचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेत भावावरही भावानेच वार केल्यामुळे तोही गंभीर जखमी झाल्याची माहिती प्राप्त झाली असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

ज्योती सुनील पाटील असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. घरगुती वादातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. संशयित दीर अनिल पांडुरंग पाटील याने घरगूती वादातून चाकूने वार केले असल्याचे समजते.

या घटनेत महिलेचा पती सुनील पांडुरंग पाटील जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पंचवटी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून घटनेचा अधिक तपास केला जात आहे.

Deshdoot
www.deshdoot.com