हुश्श! राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे कुटुंबियांसह करोनामुक्त

हुश्श! राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे कुटुंबियांसह करोनामुक्त

नाशिकरोड | प्रतिनिधी

देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे यांचा काही दिवसांपूर्वी अहवाल करोना पॉझिटिव्ह आढळून आला होता. तसेच कुटुबातील इतर सदस्यांचाही अहवाल पॉझिटिव्ह आला होता.

मात्र त्वरित उपचार सुरू केल्यानंतर आ. आहिरे व कुटुंबातील सदस्यांचा आज संध्याकाळी दुसरा अहवाल हा निगेटिव्ह आला असून त्यांना रुग्णालयातून आज डिस्चार्ज देण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी आमदार अहिरे यांच्या एका नातेवाईकाचे निधन झाले होते. त्या ठिकाणी अंत्यविधीसह काही दिवस त्या सहकुटुंब मुंबईत उपस्थित होत्या.

यातूनच त्यांना करोनाची बाधा झाली होती. दरम्यान, त्यांच्या कुटुंबातील एक सदस्य दोन दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आल्यानंतर आमदार अहिरे यांना वैद्यकीय अधिकार्‍यांनी दहा दिवस गृहस्थानबद्ध राहण्याचा सल्ला दिला होता.

यादरम्यान, आमदार आहिरे यांच्यासह काही कुटुंबातील सदस्यांचे स्वॅब नमुने तपासणीला पाठविण्यात आले होते. यामध्ये आमदार अहिरे यांचा अहवाल बाधित आढळून आला होता.

आमदार अहिरे यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर ताबडतोब त्यांना शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज त्यांचा अहवाल हा निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले.

असून दहा दिवस होम क्वॉरंटाइनचा सल्ला डॉक्टरांनी दिला. नाशिकरोडला त्या निवासस्थानी पोहोचल्यावर नागरिकांनी त्यांचे स्वागत करत पुष्पवृष्टि केली.

आपल्या सर्वांच्या प्रार्थना, सदिच्छा सोबत होत्या म्हणून मी आणि माझे कुटुंबातील सदस्य करोनावर यशस्वी मात करून घरी परतलो. मी लवकरच देवळाली मतदारसंघातील जनतेच्या सेवेसाठी हजर र्होईल. अशी प्रतिक्रिया आमदार आहिरे यांनी दिली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com