मालेगाव : करोना सुरक्षा साहित्य गोदामात धूळखात;आयुक्तांच्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघडकीस

मालेगाव : करोना सुरक्षा साहित्य गोदामात धूळखात;आयुक्तांच्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघडकीस

मालेगाव | प्रतिनिधी

शहरात करोना विषाणूचा धुमाकूळ सुरु असताना या विषाणूपासून बचाव करण्यासाठी आवश्यक सुरक्षा साहित्य नसतानादेखील मनपा व आरोग्य यंत्रणेचे अधिकारी सेवक लढत आहेत.  मात्र, दुसरीकडे वाडिया रुग्णालयाच्या गोदामात हे सुरक्षा कवचाचे साहित्य धूळखात पडले असल्याचा धक्कादायक प्रकार मनपा आयुक्त दीपक कासार यांनी टाकलेल्या छाप्यात उघडकीस आले आहे.

यामुळे संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे. वाडिया रुग्णालयाच्या गोदामात सदर सुरक्षा साहित्य पडले असतांना देखील त्याचे वाटप न करणाऱ्या भांडारपाल सह इतर कर्मचाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचा पवित्रा आयुक्त कासार यांनी घेतला आहे. सदर आरोग्य सुरक्षा कवच साहित्याचे अधिकारी सेवकांना त्वरित वाटप करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.

शहरात करोनाने अक्षरश: थैमान घातले असून अवघ्या 42 दिवसात पंधरा जणांचा बळी तर बाधित रुग्णांची संख्या 394 वर जाऊन पोहोचली आहे. या विषाणूचा पादुर्भाव रोखण्यासाठी मनपा व आरोग्य यंत्रणा दिवस-रात्र परिश्रम घेत उपाययोजना करत आहे. जनतेच्या सुरक्षितेसाठी तैनात तब्बल 70 अधिकारी व पोलिसांना देखील या विषाणूची बाधा झाली आहे मनपा वैद्यकीय अधिकारी व सेवक देखील करोणा पासून वाचू शकलेले नाही.

पादुर्भाव रोखण्याचे काम प्रत्यक्षात रस्त्यावर उतरून करणाऱ्या अधिकारी सेवकातर्फे पी पी इ किट मास्क थर्मल मिटर व सेनी टायझर आदी साहित्याची मागणी केली जात होती.

मात्र, हे साहित्य देण्यास टाळाटाळ होत असल्याने अनेक सेवक सुरक्षाकवच नसतानादेखील काम करत होते. आरोग्य सुरक्षा कवच साहित्य मिळत नसल्याच्या अधिकारी सेवकानं तर्फे होत असलेल्या तक्रारीची गंभीर दखल आयुक्त कासार यांनी घेतली सुरक्षा साहित्य व औषधांचा साठा मागवला असताना त्याचे वाटप होत का नाही हे बघण्यासाठी त्यांनी काल रात्री रुग्णालयातील गोदामावर छापा मारला यावेळी धक्कादायक प्रकार त्यांच्या निदर्शनास आला गोदामात 3500 पी पी ई किट, 20000 मास्क , एन 9 मास्क 1 हजार व थर्मल मिटर, सैनी टायझर व औषधांचा मोठा साठा धूळ खात पडल्याचे दिसून आले याची गंभीर दखल घेत आयुक्तांनी साठ्याचा पंचनामा करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले.

सखोल चौकशी व्हावी महापौर

करोना विषाणूच्या संकटाशी मुकाबला करण्यासाठी मनपा प्रशासनाने मनपा अधिकारी सेवक डॉक्टर परिचारिका स्वच्छता सेवक यांच्यासाठी सदर साहित्य खरेदी केले होते. या साहित्याची मागणी अधिकारी सेवकांना तर्फे देखील केली जात होती. मात्र हे साहित्य वाटप न करता वाडिया रुग्णालयाच्या गोदामात का लपवून ठेवण्यात आले? याची सखोल चौकशी झाली पाहिजे. यात जे दोषी आढळतील त्यांना निलंबित नव्हे तर सेवेतून बडतर्फ करा अशी मागणी महापौर ताहेरा शेख रशीद यांनी आयुक्तांकडे केली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com