भावडबारी घाटात ट्रॅक्टर उलटला; एकाच कुटुंबातील चौघे ठार, पाच गंभीर जखमी
स्थानिक बातम्या

भावडबारी घाटात ट्रॅक्टर उलटला; एकाच कुटुंबातील चौघे ठार, पाच गंभीर जखमी

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

देवळा | प्रतिनिधी

भावडबारी घाटातील अपघातील वळणावर ट्रॅक्टर उलटल्याने चौघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. मृतांमध्ये सर्वजन एकाच कुटुंबातील असल्याची प्राथमिक माहिती आहे.  या घटनेत पाच जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर मालेगाव आणि देवळा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

अधिक माहिती अशी की, चांदवड तालुक्यातील पुरी गावातील मधुकर भवर यांनी देवळा तालुक्यात शेती घेतली आहे. शेतकामासाठी भवर  कुटुंबातील नऊजन शेतात चालले होते. याच वेळी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास हा ट्रॅक्टर विंचूर प्रकाशा मार्गावर असलेल्या भावडबारी घाटातून देवळयाकडे निघाला असताना  घाटातील अखेरच्या अपघाती वळणावर ट्रॅक्टरचालकाचा ताबा सुटल्याने ट्रॅक्टर रस्त्यावर उलटले.

घाटातील उतारामुळे ट्रॅक्टर भरधाव वेगात होते यामुळे ट्रॅक्टरचा चेंदामेंदा झाला आहे. यामुळे जीवितहानी अधिक झाली. या घटनेत दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा देवळा येथील रुग्णालयात आणि एका जखमीचा मालेगाव येथील रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला.

अपघातात मधुकर भवर यांची सुनबाई सुनिता विजय भवर, नातू सोन्या विजय भवर तर शिंदे येथील त्यांचे व्याही भाऊसाहेब काळे जागीच ठार झाले तर मुलगा विजय याचाही मृत्यू झाला. असून कुटुंबातील पाच सदस्य गंभीर जखमी आहेत.

सकाळच्या सुमारास अचानक घडलेल्या घटनेमुळे अतिरुंद असलेल्या बावडबारी घाटातील दोन्ही बाजूची वाहतूक दोन तासांपेक्षा अधिक काल ठप्प झाली होती. जेसीबीच्या सहाय्याने अपघातग्रस्त ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला करून वाहतूक पूर्ववत केली. देवळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

Deshdoot
www.deshdoot.com