नाशिक : प्रेयसीचे दुसऱ्याशी लग्न होत असल्याचे कळताच ‘मजनू’चा पोलीस ठाण्यातच आत्महत्येचा प्रयत्न
स्थानिक बातम्या

नाशिक : प्रेयसीचे दुसऱ्याशी लग्न होत असल्याचे कळताच ‘मजनू’चा पोलीस ठाण्यातच आत्महत्येचा प्रयत्न

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक । प्रतिनिधी 

प्रेम करत असलेली मुलगी दुसर्‍याशी लग्न करत असल्याचे कळताच एका मजनूने थेट पंचवटी पोलीस ठाण्यातच विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली. याप्रकरणी चांदव़ड येथे राहणार्‍या तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिताराम भास्कर गायकवाड(27 रा. भरविहिर, पो. तळवाडे, चांदवड, नाशिक) असे या मजनूचे नाव आहे. सिताराम याने दि. (29) रोजी दुपारी दोन वाजता पंचवटी पोलीस ठाण्यातील ठाणे अमंलदार कक्षात जाऊन ‘ मी ज्या मुलीवर प्रेम करतो, ती दुसरीकडे लग्न करीत असल्याने सांगून बॅगेतील कराटे नावाचे विषारे औषध काढून प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.

याबाबत सहाय्यक उपनिरीक्षक बाळूअ वाघ यांनी फिर्याद दिली असून सिताराम याच्यावर आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार साबळे करीत आहे.

Deshdoot
www.deshdoot.com