कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशकात दारूबंदी
स्थानिक बातम्या

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशकात दारूबंदी

Dinesh Sonawane

नाशिक | प्रतिनिधी

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून मद्यविक्रीची दुकाने व बारमध्ये होणारी गर्दी नियंत्रित करणे गरजेचे आहे, त्यामुळे जिल्ह्यातील सर्व प्रकारे होणारी मद्य विक्री व बार आजपासून पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिले आहेत.

या संदर्भात जारी करण्यात आदेशात जिल्हाधिकारी श्री. मांढरे यांनी नमूद केले आहे की, शासनाने कोव्हीड १९ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ दिनांक १३ मार्च २०२० पासून लागू केला आहे.

या कायद्याच्या खंड २ , ३ , व ४ आणि नियमावली मधील तरतुदींच्या अंमलबजावणीसाठी प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून जिल्ह्यातील सर्व बार ,देशी दारू किरकोळ विक्री, विदेशी दारू विक्री, बार, क्लब आणि मद्य विक्रीचे सर्व परवाने अथवा दुकाने आज २१ मार्च २०२० रोजीच्या सायंकाळी सहा वाजल्यापासून पुढील आदेशापर्यंत बंद राहतील.

या आदेशाचे पालन न करणाऱ्या व्यक्तीने अथवा संस्थेने भारतीय दंड संहिता १८६० ( ४५ ) च्या कलम १८८ नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानून पुढील कार्यवाही करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी आपल्या आदेशात नमूद केले आहे

Deshdoot
www.deshdoot.com