करोनाचा प्रादुर्भाव रोकण्यासाठी आरोग्य विभागाकडून झोपडपट्टीत सर्व्हेक्षण
स्थानिक बातम्या

करोनाचा प्रादुर्भाव रोकण्यासाठी आरोग्य विभागाकडून झोपडपट्टीत सर्व्हेक्षण

Abhay Puntambekar

२ लाख ९६ हजार नागरिकांची आरोग्य तपासणी

नाशिक । प्रतिनिधी

मुंबईत धारावी झोपडपट्टीत करोनाच्या रुग्णांची वाढती संख्या रोकण्यासाठी मुंबई महापालिका व राज्य शासनाकडुन शर्थीचे प्रयत्न सुरु आहे. धारावी प्रमाणे नाशिक शहरातील झोपडपट्टीत करोना शिरकाव होऊ नये याकरिता आता महापालिका आरोग्य विभागाकडुन शहरातील सर्व झोपडपट्टी भागात नागरिकांचा आरोग्य सर्व्हेक्षण सुरू केले आहे.

गेल्या दोन आठवड्यात शहरातील झोपडपट्टीतील २ लाख ९६ हजार नागरिकांची सर्व्हे करण्यात आला आहे. दरम्यान या सर्व्हेक्षणात गरोदर महिला, १० वर्षाखालील बालके व ५० वर्षावरील नागरिकांची तपासणी केली जात आहे. यात विशेषत; करोना व सारीची लक्षण असल्यास संबंधीतांना रुग्णालयात दाखल केले जात असुन केवळ ताप असल्यास त्यांना औषधे दिली जात आहे.

शहरातील झोपडपट्टीत भागात करोनाचा शिरकाव होऊ नये म्हणुन महापालिका प्रशासनाकडुन अनाधिकृत व अधिकृत अशा १४८ झोपडपट्ट्यातील ६९ हजार घरात जाऊन ३ लाख महिला – पुरुषांचे सर्व्हेक्षण करण्याचे उद्दीष्ट समोर ठेवण्यात आले आहे. या सर्व्हेक्षणासाठी महापालिका प्रशासनाने १०० पथके गठीत केली आहे. हा सर्व्हे सुरू होऊन दोन आठवडे झाले आहे.

मात्र शहरात संजीवनगर, बजरंगनगर, समतानगर, वडाळागाव, रामनगर, फुलेनगर, राहुलवाडी, भराडवाडी, क्रांतीनगर, सातपूर परिसर, कॅनालरोड नाशिकरोड वडाळानाका, यासह काही झोपडपट्टीत सुमारे २०० च्यावर करोना बाधीत सापडले आहे. अशाप्रकारे शहरातील झोपडपट्टीत करोनाचा शिरकाव झाला आहे. यामुळे महापालिकेच्या झोपडपट्टीत मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव सुरू झाल्यामुळे आता महापालिका आरोग्य विभागाची जबाबदारी अधिक वाढली आहे.

याच पार्श्वभूमीवर झोपडपट्टी सर्व्हेक्षणाच्या कामास वेग देण्यात आला आहे. यात पहिल्या टप्प्यात झोपडपट्टी भागात घरोघरी जाऊन तापाचे, सर्दी, खोकला अशा रुग्ण तपासणीचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र पुढे यात काही बदल करण्यात येऊन यात गरोदर माता, दहा वषर्राच्या आतील बालक, पन्नास वर्षावरील महिला – पुरुष अशांची रक्तदान, मधुमेह व कर्क रोग तपासणी केली जात आहे.

या सर्व्हेक्षणात आत्तापर्यत झोपडपट्टीतील ६६ हजार ७९६ घरांची तपासणी करण्यात आली असुन यातील संख्या २ लाख ९६ हजार २३५ इतकी आहे. अशाप्रकारे १७० झोपडपट्टयापैकी सुमारे १४५ ते १५० झोपडपट्ट्यातील आरोग्य सर्व्हे पुर्ण झाला असुन अजुनही हे काम सुरू आहे.

झोपडपट्टीत सर्व्हेक्षणात अशी झाली तपासणी
* पहिल्या टप्प्यात आढळले तापाचे ११० रुग्ण. त्यांना कोणतीही लक्षणे नसल्याने औषध देण्यात आली.
* १५९१ गरोदर महिलांची तपासणी करण्यात आली
* पन्नास वर्षावरील २७२८ इतक्या पुरुषांना रक्तदाब, मधुमेह व कर्करोग असल्याचे समोर आले. तसेच २८०० महिलांना रक्तदाब, मधुमेह व कर्करोग आढळला.

Deshdoot
www.deshdoot.com