होळीनिमित्त विशेष रेल्वे गाड्या
स्थानिक बातम्या

होळीनिमित्त विशेष रेल्वे गाड्या

Abhay Puntambekar

नाशिकरोड | प्रतिनिधी 

होळीनिमित्त होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने विशेष रेल्वे गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनस ते नागपूर दरम्यान विशेष गाड़ीची एक फेरी होईल.

ही गाडी ११ मार्चला लोकमान्य टिळक टर्मिनसहून ००.४५ वाजता प्रस्थान करेल. त्याच दिवशी ती नागपूरला पोहोचेल. तेथून ती १२ मार्चला सायंकाळी १७.५० वाजता निघून दुसर्‍या दिवशी ०७.३० वाजता मुंबईला पोहोचेल.

ही गाडी ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिकरोड, भुसावळ, मलकापुर, शेगांव, अकोला, बडनेरा, वर्धा येथे थांबेल. तसेच पुणे-नागपुर या विशेष गाड़ीची एक फेरी होईल. ही गाडी १३ मार्चला पुण्याहून सकाळी १०.४५ वाजता निघून दुसर्‍या दिवशी रात्री ०२.०० वाजता नागपूरला पोहोचेल.

Deshdoot
www.deshdoot.com