वेळेत उपचार न मिळाल्याने तरुणीचा मृत्यू
स्थानिक बातम्या

वेळेत उपचार न मिळाल्याने तरुणीचा मृत्यू

Abhay Puntambekar

त्र्यंबकेश्वर |  प्रतिनिधी 

तालुक्यातील हेदपाडा येथे सर्पदंश झालेल्या युवतीला वेळेत उपचार न मिळाल्याने जीव गमवावा लागल्याची घटना घडली आहे. ककीता गणपत किलबिले (१८) असे मृत तरुणीचे नाव आहे.

दरम्यान सकाळच्या सुमारास ककीता शेतात गेली होती. यावेळी काम करीत असतांना तिला सर्पदंश झाला. हि बाब कुटुंबियांना समजताच त्यांनी १०८ या क्रमांकावर संपर्क साधून मदतीसाठी रुग्णवाहिका पाठविण्यासाठी सांगितले. परंतु हेदपाडा या गावापर्यंत जाण्यास किंवा येण्यास रस्ताच नसल्याने रुग्णवाहिका अर्ध्या रस्त्यात येउन थांबली. यावेळी ककीतास डोली करून रुग्णवाहिकेपर्यंत न्यावे लागले. परंतु दवाखान्यात नेई पर्यंत ककीताने प्राण सोडला होता.

स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले कि, आमच्या गावास रस्ता मंजूर असून रस्ता झाला नसल्याने मोठा त्रास सहन करावा लागत  आहे. एकूणच रस्ता नसल्याने ककीताला जीव गमवावा लागला. यामुळे वेळीच शासनाने याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

Deshdoot
www.deshdoot.com