Friday, April 26, 2024
Homeनाशिकयेवला : तपासणी पथकांद्वारे प्रत्येक घरी जाऊन स्क्रिनिंग करा- पालकमंत्री छगन भुजबळ

येवला : तपासणी पथकांद्वारे प्रत्येक घरी जाऊन स्क्रिनिंग करा- पालकमंत्री छगन भुजबळ

केवळ मलमपट्टी नको, अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई

येवला। प्रतिनिधी

- Advertisement -

येवल्यात करोनाची वाढती रुग्ण संख्या बघता करोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजना आणि नियोजनाबाबत आज ना. भुजबळ यांनी येवला संपर्क कार्यालय येथे अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी येवल्यात त्वरित तपासणी पथके करून तातडीने डोअर टू डोअर स्क्रिनिंग करण्यात यावे. सर्वे करताना केवळ मलमपट्टी नको, तर तपासणीतून प्रत्यक्ष निष्कर्ष द्या, अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करा, असे आदेश आज अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा पालकमंत्री भुजबळ यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.

करोनाच्या वाढत्या प्रादूर्भावाच्या परिस्थितीत लोक आपल्यापर्यंत येण्याअगोदरच त्यांची घरोघरी जाऊन तपासणी करण्यात यावी. तपासणीची संख्या वाढविण्यात यावी. पावसाळयाच्या पार्श्वभूमीवर येवला शहरातील स्वच्छता तसेच आवश्यक औषध फवारणी करण्यात यावी, असे आदेश मुख्याधिकाऱ्यांना दिले. समन्वय आणि नियोजनाचा अभाव होता कामा नये. करोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या कामकाजात दिरंगाई होणार नाही याची दक्षता घ्यावी. शहरातील गर्दी टाळण्यासाठी दक्षता घ्यावी . तसेच यावर पोलिसांनी नियंत्रण ठेवावे अशा सूचना यावेळी ना. भुजबळ यांनी दिल्या.

शेतकरी पीक कर्जाबाबत आढावा घेत शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कर्ज वाटप करण्याच्या सूचना यावेळी भुजबळ यांनी दिल्या. तसेच मका खरेदी प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यात येऊन सर्व शेतकऱ्यांची संपुर्ण मका खरेदी करण्यात यावी असे आदेश दिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या