नांदगावला करोनामुळे महिलेचा मृत्यू
स्थानिक बातम्या

नांदगावला करोनामुळे महिलेचा मृत्यू

Abhay Puntambekar

नांदगाव । प्रतिनिधी

दोन महिन्यानंतर शहरात प्रवेश केलेल्या करोनाने अवघ्या तिसऱ्याच दिवशी पहिला बळी घेतला असून एक ६२ वर्षीय महिलेचा करोनामुळे मृत्यू झाला असून त्यामुळे शहरात चिंतेचे वातावरण पसरले आहे.

सदर महिलेला मालेगाव येथे दोन दिवसांपूर्वी करोना सदृष्य लक्षणे दिसून आल्याने उपचारासाठी दाखल करण्यात आले होते आज त्या महिलेचा करोना चाचणी अहवाल येण्या अगोदरच सकाळी मृत्यू झाला .

दरम्यान सायंकाळी या महिलेचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने नांदगावकरांमध्ये काळजीचे वातावरण पसरले असून. शासकीय यंत्रणा उपाय योजना करीत आहे.

Deshdoot
www.deshdoot.com