आजपासून ‘देशदूत’ तेजस पुरस्कारासाठी मतदान सुरू; मतदान करण्यासाठी इथे क्लिक करा
स्थानिक बातम्या

आजपासून ‘देशदूत’ तेजस पुरस्कारासाठी मतदान सुरू; मतदान करण्यासाठी इथे क्लिक करा

Abhay Puntambekar

सहा क्षेत्रातील २४ युवकांना नामांकने

नाशिक । प्रतिनिधी

विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या युवकांचा ‘देशदूत’च्या वतीने दरवर्षी ‘तेजस’ पुरस्कार प्रदान करून गौरव केला जातो. पुरस्काराचा एक भाग म्हणून ‘देशदूत’च्या www.deshdoot.com संकेतस्थळावर ऑनलाईन मतदान प्रक्रिया राबवली जाते. पुरस्कारासाठी मतदानाच्या लाईन आज गुरुवारी सकाळी ६ वाजेपासून सुरू होणार असून २९ फेब्रुवारीला सायंकाळी ६ वाजेपर्यंत खुल्या राहतील.

यावर्षी सहा क्षेत्रांमधून नामांकने मागवण्यात आली होती. यामध्ये सेल्फ सस्टेन्ड बिझनेस, सामाजिक/सांस्कृतिक, फायनान्स, विधी, वैद्यकीय व प्रगतिशील शेती या क्षेत्रांचा समावेश आहे.

तेजस पुरस्कारासाठी नामांकन मिळवलेल्या युवकांच्या मुलाखती ८ फेब्रुवारीपासून ‘देशदूत’च्या अंकात तसेच ‘देशदूत’च्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्या जात आहेत.

नामांकनप्राप्त युवकांना भरघोस मतदान मिळावे यासाठी मतदान प्रक्रिया सुरू झाल्यानंतर ‘देशदूत’च्या पोलची लिंक विविध समाज माध्यमांवर शेअर करावी. सर्वात जास्त मतदान मिळवणार्‍या युवांना पुरस्कार वितरणाच्या दिवशी विशेष पुरस्काराने गौरवण्यात येईल.

असे करा मतदान

‘देशदूत’च्या www.deshdoot.com या संकेतस्थळावर जा. या ठिकाणी गेल्यावर तेजस पुरस्कारासाठी मतदान करा अशी खिडकी दिसेल. खिडकीवर क्लिक केल्यानंतर नामांकनप्राप्त युवांची नावे दिसतील. एका युजरला प्रत्येक कॅटेगिरीतील एका व्यक्तीला मतदान करता येईल.

Deshdoot
www.deshdoot.com