प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत …
स्थानिक बातम्या

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत …

Abhay Puntambekar

नाशिक । प्रतिनिधी

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत
तुमचं आणि आमच अगदी सेम असत

अस म्हणत तरुणाईने व्हॅलेंटाईन डे धुम धडाक्यात साजरा केला. महाविदयालयीन तरुणाईसह मित्र मैत्रणींने मनातील प्रेम भावनांना वाट मोकळी करुन दिली. प्रिय प्रेयसींचे आवडते ठिकाण असलेल्या कॉलेजरोड, बापू पूल, फाळके स्मारक या ठिकाणी व्हॅलेंटाईनला बहार आला होता.

आई वडिल असो की आजी आजोबा अगदी लहानांपासून ते मोठ्यापर्यंत व्हॅलेटाईन हक्काने साजरा करता येतो. त्यात तरुणाईचा उत्साह काही औरच असतो. शुक्रवारी सकाळपासूनच सोशल मीडियावर ऐकमेकांना व्हॅलेंटाईनच्या शुभेच्छा दिल्या जात होता. व्हॉटस्अ‍ॅर्र्प, फेसबुक यावर प्रेमाचा संदेश, व्हॅलेटाईनचा अर्थ व माहिती शेअर केल्या जात होत्या. प्रेय प्रियसींनी एक दिवस अगोदरच व्हॅलेंटाईन कसा साजरा करायचा याचे प्लॅनिग केले होते.शहरातील गिफ्ट दुकाने, कॅफे, कॉफि हाऊस, आईस्क्रीम पॉर्लर, हॉटेल, रेस्टारंट गर्दीने गजबजली होती.

कॉलेजरोड, गंगापूर रोड, बापू पूल, सोमेश्वर धबधबा आदी ठिकाणांवर प्रेमी युगलांची गर्दी झाली होती. महागडे गिफ्टस् व सुंदर फुले देऊन प्रियकरांनी प्रेयसीला प्रपोज करत भावनांना वाट मोकळी करुन दिली. व्हॅलेंटाईन डे प्रेमाचा संदेश देतो. प्रेम कोणावरही करता येते. हा संदेश घेऊन काही सामाजिक संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी आधार आश्रम, वृध्दाश्रम या ठिकाणी जात तेथील ज्येष्ठ नागरिकांना फुले व मिठाई देऊन हॅप्पी व्हॉलेंटाईन केला. काहींनी निसर्गाच्या सानिध्यात हा दिवस साजरा केला.

गुलाबाने खाल्ला भाव
प्रेमात गुलाबाच्या फुलाला खास महत्व. व्हॅलेंटाईन डे मुळे गुलाबाने बाजारात भाव खाल्याचे पहायला मिळाले. ऐरवी पाच ते दहा रुपयांना मिळणारे फुल वीस ते पंचवीस रुपयांना मिळत होते. फुष्पगुच्छांचे दरही वाढले होते. तरी देखील त्याची पर्वा न करता प्रेमाचा संदेश देण्यासाठी तरुणाईची गुलाबाच्या पुष्पाला पंसंती मिळाली.

Deshdoot
www.deshdoot.com