Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकनिफाडला राज्यमंत्री दर्जाचे पद; उद्धव ठाकरेंनी दिलेला शब्द पाळला

निफाडला राज्यमंत्री दर्जाचे पद; उद्धव ठाकरेंनी दिलेला शब्द पाळला

नाशिक | विजय गिते

विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी प्रचारासाठी निफाड येथे आलेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निफाडकरांना साद घालत निफाडचे तत्कालीन आमदार अनिल कदम यांना तिसर्‍यांदा संधी द्या.निफाडला लाल दिवा देऊ,असे आश्वासन दिले होते.मात्र,जनतेने हा लाल दिवा नाकारत अण्णांऐवजी काकांना साथ दिली.मात्र,तरी देखील निफाडकरांची अण्णांच्या माध्यमातून हुकलेली संधी आप्पां च्या माध्यमातून पूर्ण झाली.निफाडला जिल्हा परिषद अध्यक्षपद देऊन राज्यमंत्रीपद देत दिलेला शब्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाळला आहे.यामुळे निफाड तालुक्यात ठाकरे यांनी दिलेल्या वचनपूर्तीची चर्चा रंगली आहे.

- Advertisement -

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत निफाड विधानसभा मतदारसंघांमध्ये तत्कालीन आमदार अनिल कदम आणि माजी आमदार दिलीप बनकर यांच्यामध्ये तिसर्‍यांदा निवडणुकीचा फड रंगला.या निवडणुकीच्या प्रचाराच्यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे कदम यांच्या प्रचारार्थ निफाड तालुक्यात आले होते.त्यावेळी त्यांनी मतदारांना साद घालताना कदम यांना तिसर्‍यांदा विधानसभेत जाण्याची संधी द्या.निफाडकरांना लाल दिवा देऊ,असे आश्वासन त्यावेळी दिले होते.

मात्र, अटीतटीच्या निवडणुकीत आमदार अनिल कदम यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप बनकर यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला.या निवडणुकीनंतर शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस महाविकास आघाडीच्या झेंड्याखाली एकत्र येत सत्तेवर आले.राज्यात शिवसेना सत्तेवर आली खरी,मात्र निफाडमध्ये शिवसेनेचे उमेदवार अनिल कदम यांना पराभव पत्करावा लागला.त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी आश्वासन देऊनही निफाडला लाल दिवा मिळणे अशक्य झाले.त्यामुळे निफाडकरांची विशेषत: शिवसैनिकांमध्ये ही लाल दिवा न मिळाल्याची सल कायम राहिली.

दरम्यान,विधानसभा निवडणुकीनंतर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाची निवड झाली.या निवडणुकीत शिवसेनेचे निफाड तालुक्यातील बाळासाहेब क्षिरसागर यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ टाकत पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीआप्पांच्या माध्यमातून का होईना निफाडला राज्यमंत्रीपद दिले.यामुळे निफाडकरांची लाल दिव्याची हुकलेली संधी बाळासाहेब क्षीरसागर यांच्या माध्यमातून पूर्ण झालीआहे.

विधानसभा निवडणुकीत चारही राजकीय पक्षांपैकी सत्तेचे गणित जुळेल यासाठी दोन वा तीन पक्ष एकत्र येणे गरजेचे होते.तेव्हाच राज्यात सत्तेचा सोपान चढणे शक्य होणार होते.मात्र,निवडणुकीत असलेली युती मतमोजणीनंतर युतीमध्ये शिवसेना-भाजपा युतीमध्ये फाटाफूट झाले आणि शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस असे तीन पक्ष एकत्र येऊन राज्यात महा विकास आघाडी ची सत्ता स्थापन झाले आहे ही सत्तास्थापन करत असताना सत्तेचे गणित जुळवितांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे भाजपाला जाऊन मिळाले होते हे समीकरण जुळून आले असते तर निफाडचे आमदार दिलीप बनकर यांना मंत्रीपद मिळणार अशी शक्यता वर्तवली जात होती त्यानंतर महा विकास आघाडी होऊनही बनकर यांचे नाव चर्चेत होते मात्र दिलीप बनकर यांचा मंत्रीपदाची संधी हुकली त्यामुळे नाही विधानसभेत राज्यस्तरावरील मंत्रीपद मिळाले नसले तरी बाळासाहेब क्षीरसागर यांच्या माध्यमातून निफाडला राज्यमंत्रिपदाचा का होईना दर्जा मिळालेला आहे

पंधरावर्षानंतर लाल दिवा
पंधरा वर्षानंतर निफाड लाल दिवा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून पंढरीनाथ थोरे यांच्या माध्यमातून निफाड ला दोन वेळा लाल दिवा नशिबात आलेला आहे मात्र त्यानंतर चौदा पंधरा वर्षांच्या कालखंडानंतर बाळासाहेब क्षीरसागर यांच्या माध्यमातून निफाडला राज्यमंत्रीपद मिळाले आहे त्यामुळे निफाडचा राजकीय दबदबा जिल्हास्तरावर पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या