त्र्यंबकेश्वर येथे सर्व शासकीय सेवा योजनांचा माहिती महामेळावा संपन्न
स्थानिक बातम्या

त्र्यंबकेश्वर येथे सर्व शासकीय सेवा योजनांचा माहिती महामेळावा संपन्न

Abhay Puntambekar

त्र्यंबकेश्वर | मोहन देवरे

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण ,मुंबई  व जिल्हा विधी सेवा , जिल्हा प्रशासन नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने त्र्यंबकेश्वर येथे सर्व शासकीय सेवा योजनांची माहिती महामेळावा आयोजित करण्यात आला होता. महामेळावाचे उदघाटन उच्च न्यायलय न्यायमूर्ती मुंबई तथा नासिक पालक न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांच्या हस्ते करण्यात आले .

यावेळी महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव शिवकुमार डिगे, जिल्हा न्यायाधीश अभय वाघवसे, जिल्हा विधी सचिव प्रसाद कुलकर्णी उपविभागीय अधिकारी तेजस चव्हाण, तहसीलदार दीपक गिरासे तहसील कार्यालयाचे सर्व विभागीय अधिकारी , कर्मचारी  कार्यक्रमास  यावेळी उपस्थित होते.

यात शासनाच्या विविध खात्यांनी आपल्या वर्गात विविध  योजनांची माहिती ती लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने परिपत्रके उपलब्ध करून दिली यात महसूल आरोग्य विभाग, बँका, दूरसंचार, पोस्ट ,कृषी, पोलीस, आदिवासी विकास गट, महिला बालकल्याण समाज कल्याण ,तालुका पशुसंवर्धन, राज्य परिवहन महिला बाल विकास, औद्योगिक त्र्यंबक नगर परिषद कृषी विभाग, पंचयत समिती शासनाच्या विविध विषयावरील कायद्या विषयक बाबींची माहिती पालक न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांनी उपस्थितांना दिली.

तालुक्यातील विविध भागातून येऊन नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला यावेळी न्यायमूर्ती श्री प्रसाद कुलकर्णी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालय सत्र न्यायालय अभय वाघ वाघ यांनी मार्गदर्शन केले लोकपयोगी अशा शासकीय खात्याचे विभागाचे स्टॉल सब स्टॉल होते संबंधित टेबलवर अधिकारी माहिती देत होते तसेच महिती पत्रके वाटली जात होती हजारो ग्रामस्थांनी  भेट दिली तीन महिन्यांनी
असा शासकीय योजनांचा महा मेळावा भरवावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे

Deshdoot
www.deshdoot.com