यंदा जि.प. सेवकांच्या बदल्या नाही
स्थानिक बातम्या

यंदा जि.प. सेवकांच्या बदल्या नाही

Abhay Puntambekar

नाशिक । प्रतिनिधी

मे महिना म्हटला की जिल्हा परिषद सेवकांच्या बदल्या अन त्यासाठी प्रशासनाची लगीनघाई असे समीकरण वर्षानुवर्षे आहे.त्यासाठी जि. प. सामान्य प्रशासन विभागाने दरवर्षीप्रमाणे यंदाही बदल्यांबाबतची पूर्व तयारी सुरू केलेली होती.प्रतीक्षा होती ती केवळ शासन आदेशाची. मात्र, यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने यंदा सेवक बदल्या न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जि.प. सेवकांच्या बदल्या होणार नाहीत. या निर्णयाने सेवक वगार्त कही खुशी काही गम असे वातावरण आहे.

मे महिन्यात दरवर्षी, जिल्हा परिषदेच्या वर्ग तीन आणि चारमधील सेवकांच्या बदल्यांची प्रक्रिया पार पडत असते. त्यासाठी आधीच बदलीपात्र सेवकांकडून आवश्यक ती माहिती जमा केली जात असते. यावर्षी मात्र बदल्या होण्याविषयी साशंकता आहे. करोना व्हायरसने धुमाकूळ घातला असून, या आजाराचा सामना करण्यासाठी सरकारी यंत्रणा व्यस्त आहे. तसेच विविध प्रकारच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनाही करण्यात आल्या आहेत. पाचपेक्षा अधिक नागरिकांना एकत्र येण्यास बंदी आहे. गर्दी टाळणे हा त्यामागचा उद्देश आहे. म्हणून सरकारी कार्यालयांमध्ये दहा टक्केच कर्मचारी उपस्थित ठेवण्याचे आदेश आहेत.

सामान्य प्रशासनाने दरवर्षाप्रमाणे यंदाही बदल्यांसंदर्भात माहिती जमा करून ठेवली आहे. बदलीपात्र कर्मचाºयाने आतापर्यंत नेमकी कुठे-कुठे सेवा बजावली आहे, यासह अन्य माहितीचा त्यात समावेश आहे. पुढील प्रक्रिया राबविण्यापूर्वी मात्र सरकारच्या आदेशाची प्रतीक्षा केली जात आहे. याबाबत ग्रामविकास विभागाला पत्र पाठविले. राज्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गडद होत आहे. या परिस्थितीशी सामना करतांना राज्य शासनाने यंदा कोणत्याही विभागातील कर्मचारी बदल्या न करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे. करोनात कर्मचारी वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत आहे. या परिस्थितीत बदली केल्यास त्याचा परिणाम कामवार होऊ शकतो. यासाठी बदली प्रक्रीया न राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, तसा अध्यादेश देखील काढला आहे.
त्यामुळे जिल्हा परिषदेत यंदा सेवकांच्या बदल्या होणार नाहीत.

समुपदेशन प्रक्रियेव्दारे सेवकांची बदली प्रक्रीया पार पाडली जाते. यात सेवकांना एकत्र बोलवावे लागते. त्यामुळेच गदीर्ही झाली असती. अनेक सेवकांची करोनाच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळया ठिकाणी नियुक्ती केलेली आहे. जिल्हयात संचारबंदी लागू असल्याने या प्रक्रियेसाठी तालुकास्तरावरून जि.प.त सेवक येणार कसे, हाही प्रश्न होता. त्यामुळे बदली प्रक्रीया राबविण्यात येऊ नये ,अशी मागणी शासनाकडे केली होती. शासनाने सेवकांच्या बदल्या न करण्याचा निर्णय घेऊन दिलासा दिला आहे.
विजयकुमार हळदे ( जिल्हाध्यक्ष, जि.प. कर्मचारी युनियन)

Deshdoot
www.deshdoot.com