ग्राहक तक्रार निवारण कार्याला व्यापक स्वरुप मिळेल-भंगाळे
स्थानिक बातम्या

ग्राहक तक्रार निवारण कार्याला व्यापक स्वरुप मिळेल-भंगाळे

Abhay Puntambekar

नाशिक । प्रतिनिधी

प्रतिसाद बहुउद्देशिय सेवा मंडळ,नाशिक जिल्हा नाशिक संस्था व शरद बोडके यांच्या रुपाने ग्राहक तक्रार निवारण कार्याला व्यपक स्वरुप मिळेल,असे प्रतिपादन राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग,महाराष्ट्र,मुंबईचे अध्यक्ष न्या.ए.पी.भंगाळे यांनी केले.प्रतिसाद बहुउद्देशिय सेवा मंडळ,नाशिक जिल्हा नाशिक संस्था अंतर्गत ग्राहक तक्रार निवारण कार्यलयाचे उद्दघाटन गाळा नं.1 भवानी कुटीर अपार्टमेंट,हिरावाडी,पंचवटी येथे त्यांच्या हस्ते झाले.त्यावेळी ते बोलत होते.

न्या.भंगाळे यांनी नागरिकांनी आपली दैनंदिन जीवनांत ग्राहक म्हणुन कशा पध्दतीने तात्पर रहावे,यांवर मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, आपण कुठलाही व्यवहार करतांना पक्के बिल घेणे गरजेच आहे.पक्के बिल नसल्याने  आपण ग्राहक म्हणून दुकानंदारांवर कुठल्याही प्रकारचा दावा  कोर्टात सादर करु शकत नाही.केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांना ग्राहकांच्या समस्यांची जान आहे व ते व्हिडीओ प्रोग्रॉम व्दारा मिटींग घेत ग्राहकांच्या समस्या जाणून घेत त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगितले.आता ना. छगन भुजबळ याच्याकडे या खात्याची जबाबदारी देण्यात आल्याने नाशिककरांच्या अधिकाधिक समस्या सोडविण्यासाठी त्यांची ही मदत होईल,असे सांगितले.

भंगाळे यांचा सत्कार प्रतिसाद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शरद बोडके यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी मलिंद सोनवणे(अध्यक्ष ग्राहक तक्रार निवारण मंच,नाशिक)यांचा सत्कार प्रतिसाद संस्थेच्या उपअध्यक्षा सौ. सोनाली बोडके यांनी केला.यावेळी अंबादास खैरे ,अरविंद नर्सिकर(जिल्हा पुरवठा अधिकारी,नाशिक), पृथ्वीराज गायकवाड ,सचिन शिंपी, सत्यजित आहिरे,प्रेरणा कांळुखे,कुलकर्णी, भुषण देवरे,प्रताप कुदळे,संतोष नाथ, काजल इंगळे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाची प्रस्ताविक प्रतिसाद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शरद बोडके यांंनी केले.ते म्हणाले,नागरिकांनी आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये होत असलेली फसवणुक टाळण्यासाठी आपण एक ग्राहक म्हणुन ग्राहक कायद्याची माहिती असणे काळाची गरज आहे .आज ग्राहकांना अनेक समस्यांना सामोरे जावा लागते . बँकेच्या नावावर फसवा फोन करुन लुट केली जाते.छापील किंमतीपेक्षा आधिक दर घेऊन दुकांनादारांकडुन ग्राहकांची लुट केली जाते.ग्राहक संरक्षण कायदा २०१९ अंर्तगत आता नियम अधिक कठोर करण्यात आले असून ग्राहक सक्षम बनविण्यात आले आहे,असे बोडके यांनी सांगितले .

ज्या ग्राहकांची तक्रार असले त्यांनी या कार्यालयात येऊन तक्रार द्यावी शक्य नसल्यास कार्यलयाच्या मो. ९९२१११९२४० या क्रमांकावर संपर्क साधावा,त्यांना वकीलांच्या माध्यमातुन विनामुल्य मार्गदर्शन मिळणार असल्याचे बोडके यांनी सांगितले.

सुत्रसंचालन अनिता आहिरे यांनी केले.आभार प्रदर्शन भुषण देवरे यांनी केले . कार्यक्रम यशस्वीतेसाठी काजल इंगळे , सारीखा मैना , प्रताप कुदळे यांनी परिश्रम घेतले.

Deshdoot
www.deshdoot.com