Friday, April 26, 2024
Homeनाशिकतेजस पुरस्कार- २०२० : विविध देशांतील वाचकांकडून मतदान

तेजस पुरस्कार- २०२० : विविध देशांतील वाचकांकडून मतदान

अवघ्या पाच दिवसांतच गाठले शिखर

नाशिक । प्रतिनिधी

- Advertisement -

विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या युवकांचा ‘देशदूत’च्या वतीने दरवर्षी ङ्गतेजसफ पुरस्कार प्रदान करून गौरव केला जातो. पुरस्काराचा एक भाग म्हणूनwww.deshdoot.com या  संकेतस्थळावर ऑनलाईन मतदान प्रक्रिया राबवली जात आहे. गेल्या आठवठ्यापासून सुरू झालेल्या मतदान प्रक्रियेत विविध देशांतील लाखो वाचकांनी मतदान केले आहे.

यावर्षी सहा क्षेत्रांमधून नामांकने मागवण्यात आली होती. यामध्ये सेल्फ सस्टेन्ड बिझनेस, सामाजिक/सांस्कृतिक, फायनान्स, विधी, वैद्यकीय व प्रगतिशील शेती या क्षेत्रांचा समावेश आहे.

गेल्या आठवड्यात गुरुवारपासून मतदान सुरू झाले. मतदान सुरू झाल्यापासून तेजस पोलची लिंक सोशल मीडियासह सर्वत्र पसरली आहे. त्यामुळे या लिंकवर दर सेकंदाला शेकडो वाचक मतदान करत आहेत. हे मतदान शनिवारी (दि.२९) सायंकाळी ६ वाजेपर्यंत करता येणार आहे. त्यामुळे नामांकन मिळवलेल्या युवकांनी जास्तीत जास्त ठिकाणी ही लिंक शेअर करून अधिकाधिक मतदान मिळवण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

सर्वात जास्त मतदान मिळवणार्‍या युवांना पुरस्कार वितरणाच्या दिवशी विशेष पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.

असे करा मतदान
www.deshdoot.com या संकेतस्थळावर जा. या ठिकाणी गेल्यावर तेजस पुरस्कारासाठी मतदान करा अशी खिडकी दिसेल. खिडकीवर क्लिक केल्यानंतर नामांकनप्राप्त युवांची नावे दिसतील. एका युजरला प्रत्येक कॅटेगिरीतील एका व्यक्तीला मतदान करता येईल.

या देशांतून सर्वाधिक मतदान
‘देशदूत’ तेजस पुरस्कारासाठी भारताबरोबरच दुबई, सिंगापूर, अमेरिका, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, चीन, इंग्लड, जर्मनी यासह अनेक देशांतून मतदानाचा ओघ सुरू आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या