पंचवटीत ड्रोनच्या साह्याने सर्वेक्षणास प्रारंभ
स्थानिक बातम्या

पंचवटीत ड्रोनच्या साह्याने सर्वेक्षणास प्रारंभ

Abhay Puntambekar

नाशिक । प्रतिनिधी

स्मार्ट सिटी कंपनीकडून मनपा क्षेत्रातील गावठाण विकासाचे काम हाती घेण्यात येणार असून जुने नाशिक, पंचवटी गावठाण याठिकाणी विकास कामांना मंजुरी मिळाली आहे. याभागातील अरुंद रस्ते यांच्यामुळे गावठाण सर्वेसनात अडचणी येत असल्याने याठिकाणी ड्रोनच्या परवानगीनंतर पंचवटीतून याकामास प्रारंभ झाला आहे.

स्मार्ट सिटी कंपनी अंतर्गअत नाशिक महापालिकेतील गावठाण विकासाला प्राधान्य देण्यात आले आहे. याच भागात पुनर्विकासाची कामे झाल्यानंतर आता प्रत्यक्ष गावठाण विकासाची कामे केली जाणार आहे. यात प्राधान्याने जुने नाशिक व पंचवटी गावठाणातील विकास कामांना मंजुरी मिळाली असुन या कामांच्या निविदा काढण्यात आल्या आहेत.

यात रस्त रुंदीकरण, भूमिगत गटारी, २४ तास पाणीपुरवठा कार्यान्वीत करणे, नळांना मीटर बसविणे, जुन्या पाणी पुरवठा पाईपलाईन बदलणे, पथदीप बसविणे आदी कामांचा समावेश आहे. याभागात अरुंद रस्ते मोठ्या प्रमाणात आहे. तसेच याठिकाणी स्थानिकांकडन ४ ते ५ एफएसआयची मागणी झाली आहे. यामुळे किती एफएसआय दिल्यात याठिकाणी किती ताण पडेल? या सर्व बाबींचा अभ्यास करण्यासाठी याभागाचे ड्रोनच्या साह्याने सर्वेक्षण करावे लागणार आहे.

या सर्वेचे काम क्रिसील कंपनीला देण्यात आले असून कंपनीने प्रारंभी ड्रोन वापरासाठी शहर पोलीसांकडे परवानगीची मागणी केली होती. शहर पोलीसांनी डीजी नागरी हवाई उड्डाण विभागाची परवानगी घेण्यास सांगितले होते. यासंदर्भात कंपनीने पत्रव्यवहार केल्यानंतर शहर पोलीसांनी आता सशर्त परवानगी दिली आहे.

या परवानगीनंतर आता क्रिसील कंपनीकडून जुने नाशिक, पंचवटी, सातपूर, देवळालीगांव, आडगांव व मखबलाबाद याठिकाणच्या गावठाणचे ड्रोनच्या साह्याने सर्वेक्षण केले जाणार आहे. परवानगी मिळाल्यानंतर कंपनीने तीन चार दिवसांपासून पंचवटी गावठाणच्या सर्वेक्षणाचे काम सुरू केले आहे. टप्प्या टप्प्याने हे काम पुर्ण झाल्यानंतर गावठाण विकासाचे काम पुढे जाणार आहे.

Deshdoot
www.deshdoot.com