Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकशहरात झोपडपट्टीतील ३ लाख नागरिकांचे सर्व्हेक्षण सुरु

शहरात झोपडपट्टीतील ३ लाख नागरिकांचे सर्व्हेक्षण सुरु

मनपाच्या १०० पथकांकडुन झोपडपट्ट्यांत होणार आरोग्य तपासणी

नाशिक । प्रतिनिधी

- Advertisement -

मुंबईत धारावी झोपडपट्टीत करोनाच्या रुग्णांची वाढती संख्या रोखण्यासाठी मुंबई महपालिका व राज्य शासनाकडुन शर्थीचे प्रयत्न सुरु आहे. धारावी प्रमाणे नाशिक शहरातील झोपडपट्टीत करोना शिरकाव होऊ नये याकरिता आता महापालिका आरोग्य विभागाकडुन शहरातील सर्व झोपडपट्टी भागात नागरिकांचा आरोग्य सर्व्हेक्षणास प्रारंभ करण्यात आला आहे. झोपडपट्टीतील ३ लाख नागरिकांच्या तपासणीचे लक्ष ठेवण्यात आले आहे.

नाशिक शहरातील बजरंगवाडी भागातील एक महिलेला करोनाची बाधा झाल्याची माहिती समोर येताच शहरातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या बजरंगवाडी भागाला महापौर सतिश कुलकर्णी यांनी भेट देऊन पाहणी केली होती. याठिकाणी सोशल डिस्टसिंग राखणे आवश्यक असल्याचे सांगत त्यांनी करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी स्थानिक नागरिकांना आवाहन केले होते. तसेच धारावी प्रमाणे याठिकाणी करोना प्रादुर्भाव होऊ नये म्हणुन महपाालिका अधिकार्‍यांना काही सुचना केल्या होत्या.

शहरात संजीवनगर, समतानगर, वडाळागाव यासह काही झोपडपट्टीत करोना बाधीत सापडले आहे. यामुळे शहरातील झोपडपट्टीत करोनाचा शिरकाव झाल्यास त्यास अटकाव करणे मोठे अवघड होण्याची शक्यता आहे. सध्या धारावी(मुंबई) मध्ये निर्माण झालेली स्थिती नाशिक शहरातील झोपडपट्टी भागात होऊ नये म्हणुन महापालिका आरोग्य विभागाकडुन आरोग्य तपासणी सर्व्हेक्षणास प्रारंभ करण्यात आला आहे. या सर्व्हेक्षणासाठी महापालिका प्रशासनाने १०० पथके गठीत करण्यात आली असुन त्यांच्याकडुन या कामास प्रारंभ करण्यात आला आहे.

ही पथके शहरातील अनाधिकृत व अधिकृत अशा १४८ झोपडपट्ट्यातील ६९ हजार घरात जाऊन ३ लाख महिला – पुरुषांचे सर्व्हेक्षण करणार आहे. यात संबंधीत नागरिकांना ताप, सर्दी व खोकला अशी लक्षणे असलेल्या संशयित रुग्णांचा शोध घेतला जाणार आहे. अशा संशयितांना रुग्णालयात दाखल करुन त्यांच्यावर उपचार केले जाणार आहे. अशाप्रकारे शहरातील झोपडपट्ट्यातील करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणुन व्युहरचना करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या