सुरगाणा : हतगडला निसर्ग चक्रीवादळाने शाळा आणि घरांचे नुकसान
स्थानिक बातम्या

सुरगाणा : हतगडला निसर्ग चक्रीवादळाने शाळा आणि घरांचे नुकसान

Abhay Puntambekar

हतगड । लक्ष्मण पवार

नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील हतगड मध्ये काल दिवसभर पाऊस होता. काल रात्री २ वाजेच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात वादळी वारा व पाऊस आल्यामुळे जिल्हा परिषद शाळेचे छत उडाले असून मोठे नुकसान झाले आहे. बाबुराव गाढवे यांचे रहाते घराचे छत पूर्णपणे उडाले असल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

गावातील ग्रामस्थांचे छोटे मोठे नुकसान झाले आहे . नुकसानीच्या ठिकाणचे पंचनामे करावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com