Tuesday, April 23, 2024
Homeनाशिकसुलाफेस्टला रोमांचक वातावरणात सुरुवात; हॉट चिपच्या गाण्यांवर थिरकली तरुणाई

सुलाफेस्टला रोमांचक वातावरणात सुरुवात; हॉट चिपच्या गाण्यांवर थिरकली तरुणाई

नाशिक l प्रतिनिधी

सुला विनयार्डस्‌च्या प्रांगणात तेराव्या हंमागातील सुलाफेस्ट २०२० ला आज (दि. ०१) उत्साहात सुरवात झाली. या संगीत महोत्सवात दिग्गज कलावंतांनी सादरीकरण केले. पहिल्या दिवशी ब्रिटीश चार्ट टॉपर हॉट चिप यांचे सादरीकरण लक्षवेधी ठरले. महोत्सवात उद्या (दि.२) प्रसिद्ध संगीतकार सलीम-सुलेमान यांचे सादरीकरण होणार आहे.

- Advertisement -

विविध पेयांचा आस्वाद घेतांना, संगीत सादरीकरणाचाही मनमुराद आनंद सहभागींनी घेतला. भारतीय बॅंड सिंधी करीने ऍम्फीथिएटर व्यासपीठावरील सादरीकरणाला सुरवात झाली.

यानंतर स्मॉलटॉक, व्हेन चार मेट टोस्ट, जेह सन ऍण्ड द रायझिंग टाईड (अमेरीका), रूंम्बा दे बोदास (इटली) यांच्या सादरीकरणाने रंगत वाढवली. तर पहिल्या दिवसाचे हेललायनर ठरले युकेतील हॉप चीप बॅंडचे सादरीकरण. इलेक्‍ट्रीक लेन व्यासपीठावर माईक अकीडा (ग्रीस), अशेस (भारत), सशांती (रशिया), कोहरा (भारत) अशा विविध कलावंतांच्या सादरीकरणाने मनोरंजन केले.

दरवर्षी प्रमाणे यावर्षीदेखील आम्ही नाविन्यपूर्णता आणण्यासाठी विविध प्रयोगांना सहभागींचा चांगला प्रतिसाद मिळाला. संगीतप्रेमींचा उत्साह थक्‍क करणारा असा होता. सुलाच्या स्थापनेचे वीस वर्षे साजरे करत असतांना, यावर्षीचा महोत्सव अनेक अंगांनी महत्त्वपूर्ण असा राहिला. हजारो संगीतप्रेमींनी आपला विकएंड येथे साजरा करतांना, आनंदाची अनुभूती घेतल्याने, सुलाफेस्ट हा देशातील सर्वात लोकप्रिय महोत्सव असल्याचे पुन्हा एकदा अदोरेखीत केले आहे.

खवय्यांसाठी लज्जतदार पदार्थांना सुलाच्या वाइनची जोड मिळाली. “पॉल ऍन्ड माईक’च्या चॉकलेटची चव सुलाच्या वाइन वाढविणारे ठरले. पंझानीद्वारे पास्ता वाइनसोबत खाताना अधिकच चविष्ट ठरल्याचे अनेकांनाही संगितले.

बॉम्बे फूड ट्रक, वोक एक्‍स्प्रेस, मलाका स्पाइस, पफ्स ऍन्ड रोल्स, कॅफे ब्लिस, मकालू, बिर्याणी बाय किलो अशा विविध पर्यायांनीदेखील तृप्त केले.

“गोप्रो’च्या प्रतियोगीतेतील सहभाग उत्साह वाढविणारा होता. रॉयल इन्फिल्डतर्फे “जिटी’ची टेस्ट ड्राइव्ह घेण्यासाठीही गर्दी झाली होती. “लेट्‌स कॅम्प आउट’तर्फे साकारलेल्या टेंट सिटीमध्ये विश्रांतीमुळे महोत्सवात सहभागाचा आनंद द्विगुणित झाला.

लिव्हिंग फुड्‌सच्या माध्यमातून निऑन आणि ३६० डिग्री गिफ फोटो बूथद्वारे छायाचित्र टिपायलादेखील गर्दी झाली होती. ग्रेप स्टोम्पिंग, ग्रेप सिड ऑइलपासून फूट मसाज, टॅरो कार्ड रिडिंग, वाइन गेम्स, फन मास्टर क्‍लासेस, विनो स्पा अशा विविध उपक्रमांमध्येही चांगला सहभाग राहिला. खरेदीचा आनंद घेण्यासाठी “यूएस पोलो’ची शृंखला उपलब्ध होती.

वाईन कॅनचे अनावरण

सुलातर्फे वीसावा स्थापना दिवस साजरा करत असतांना, भारतातील पहिल्या वाईन कॅनचे अनावरण महोत्सवात करण्यात आले. “दिआ वाईन स्पाक्‍लर’च्या माध्यमातून वाईन अतिशय सोप्या व सुविधायुक्‍त पद्धतीत उपलब्ध करून दिल्याचे यावेळी सांगितले. या पद्धतीत रेड व व्हाईट वाईन उपलब्ध होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या