PhotoGallery : सलीम-सुलेमान च्या सादरीकरणाने ‘सुलाफेस्ट-२०२०’ ची सांगता

PhotoGallery : सलीम-सुलेमान च्या सादरीकरणाने ‘सुलाफेस्ट-२०२०’ ची सांगता

नाशिक | प्रतिनिधी 

देशातील सर्वात सुंदर व सुरेख संगीत महोत्सव असलेल्या सुलाफेस्ट २०२० च्या तेराव्या हंगामाला संगीतप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सुला विनयार्डस्‌च्या स्थापनेचे वीस वर्षे साजरे करत असतांना या आनंदाच्या क्षणांमध्ये देश-विदेशातील पर्यटक सहभागी झाले होते. यानिमित्त सहभागींनी आयुष्यभर स्मरणात राहाणाऱ्या आठवणी कैद केल्या. वाईनच्या जोडीला खाद्य पदार्थ, रंजक उपक्रमांमध्ये चांगला सहभाग राहिला.

सुलाच्या स्थापनेची वीस वर्षे साजरी करण्याचा आनंद द्विगुणीत करणारा क्षण ठरला तो, वाईन कॅन असलेल्या दिआ वाईन स्पाक्‍लर या भारतात प्रथमच अवगत केलेल्या उत्पादनाचा. रेड व वाईट वाईन या माध्यमातून उपलब्ध करून दिल्याने सहभागींनी या पेयाला भरघोस प्रतिसाद दिला.

सुलाच्या जगप्रसिद्ध वाईन्सच्या जोडीला सहभागींनी जागतिक स्तरावरील विविध कॉकटेल्सचाही आनंद घेतला. सुला एम्पोर्ट शाखा असलेल्या सुला सिलेक्‍शन्सच्या माध्यमातून बेलूगा नोबल रशियन वोडका, द बोटनीस्ट, कॉईनथ्रु, बडवायझर, असाही अशा पेयातील विविध पर्यायांनी सहभागींना तृप्त केले.

नेहमीच दिग्गज कलावंतांना आपल्या व्यासपीठावर सादरीकरणासाठी आमंत्रित करणाऱ्या सुला विनयार्डस्‌तर्फे यंदाच्या सुलाफेस्ट 2020 मध्ये बॉलीवूडमधील प्रसिद्ध संगीतकार सलीम-सुलेमान जोडीला अवगत करण्यात आले. या जोडीने विक्रमी सादरीकरण करतांना संगीतप्रेमींना मनसोक्‍त थिरकविले. भारतातील लोकप्रिय अशा वोक्‍ट्रोनिका बॅंडनेही आपल्या शैलीत सादरीकरण करतांना निखळ मनोरंजन केले. तर डच-न्यूझिलॅण्डच्या ट्रायो असलेल्या बाय बेबी यांच्या सादरीकरणानेही मंत्रमुग्ध केले. द लोकल ट्रेन यांच्या संगीतरचनांनाही संगीतप्रेमींची पसंती लाभली.

यावेळी प्रथमच अवगत केलेल्या विनोस्पिअर या विभागालाही चांगला प्रतिसाद मिळाला. मास्टर क्‍लासेसमध्ये सहभागी झालेल्यांना वाईनमेकर्सकडून भरपुरशी रंजक माहिती अवगत करून दिली. द पैझनी यांच्या पास्टा कार्टला खवय्यांनी गर्दी केली होती. तर पौल ऍण्ड माईक यांच्या चविष्ट चॉकलेट्‌सख लंडन डेअरीच्या विविध पदार्थांना खवय्यांचा प्रतिसाद मिळाला. लिव्हींग फूड्‌सच्या विभागात छायाचित्र, सेल्फी टिपण्यासाठी गर्दी झाली होती. वाईन गेम्स, विनो स्पा, ग्रेप सिड ऑईलपासून फूट मसाज अशा विविध माध्यमातून सहभागी दिवसभर व्यस असल्याचे चित्र बघायला मिळाले. तर पतंग उडविण्यासह, अन्य रंजक उपक्रमांना चांगला प्रतिसाद मिळाला. टॅरो कार्ड रिंडींगच्या ठिकाणीही गर्दी झाली होती. तर युएस पोलो असोसिएशनमार्फत पर्यावरण पुरक उत्पादनांचाही जोरदार खरेदी यावेळी करण्यात आले.

सुला विनयार्ड्सचे संस्थापक व सीईओ राजीव सामंत म्हणाले की, सहभागीचा प्रतिसाद पाहता यावर्षीचा सुलाफेस्ट सर्वच बाबतीत विशेष ठरला. हा महोत्सवातून आम्ही सर्वांसोबत सुलाच्या स्थापनेची वीस वर्षे साजरे केले. सुमारे दहा हजार संगीतप्रेमींच्या सहभागामुळे सुलाफेस्ट हा देशातील सर्वात लोकप्रिय संगीत महोत्सव आहे, हे अधोरेखित झाले आहे. सोबत महोत्सवातील सभागासोबत आयुष्यातील अमूल्य क्षणांची नोंद केली आहे.

एक व्यक्ती एक झाड
सुला फेस्ट च्या माध्यमातून येथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्ती एका झाडाचे वृक्षारोपण करणार आहे. तसेच पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीकोनातून सकारात्मक पाऊल उचलत प्लास्टिक बॉटल व अन्य कचरा टाकण्यासाठी व्हेंडींग मशीन ठेवण्यात आले होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com