Friday, April 26, 2024
Homeनाशिकदहावीची परीक्षा : ‘द्वितीय भाषा मराठी’ बाबत विद्यार्थी समाधानी

दहावीची परीक्षा : ‘द्वितीय भाषा मराठी’ बाबत विद्यार्थी समाधानी

 विभागात एकही कॉपीबहाद्दर नाही

नाशिक । प्रतिनिधी

- Advertisement -

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात येणार्‍या इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी बुधवारी (दि. ४) द्वितीय भाषा मराठीसह अन्य भाषा विषयांचा पेपर घेण्यात आला. हा पेपर सोपा होता, उत्तरे लिहिण्यासाठी वेळ पुरला, असे परीक्षार्थींनी सांगून पेपर सोपा गेल्याचे समाधान व्यक्त केले.

याच पेपरसह अन्य विषयांचेही पेपर ‘कॉपीमुक्त’ पार पाडण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार असल्याचे नाशिक मंडळाने सांगितले. राज्य मंडळाच्या दहावीच्या परीक्षेसाठी यंदा राज्यभरातून १७ लाख ६५ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी नाशिक जिल्ह्यातून २०२ केंद्रांतून एकूण ९८ हजार विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत.

बुधवारी घेण्यात आलेल्या द्वितीय भाषा मराठी पेपरसाठी २८ हजार परीक्षार्थी बसले होते. त्यात एकही कॉपीची केस आढळून आली नाही. या पेपरसह अन्य विषयांचे पेपरही सुरळीत पार पडले.

दक्षता व भरारी पथके
दहावीची परीक्षा निर्विघ्नपणे व कॉपीमुक्त व्हावी, यासाठी जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता पथक स्थापण्यात आले आहे. यात शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकरी, गट शिक्षणाधिकार्‍यांसह, प्राचार्य व मुख्याध्यापकांचा समावेश आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विभागात १६ पेक्षा आधिक भरारी पथके कार्यरत असून त्यांची विविध परीक्षा केंद्रांंवर करडी नजर आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या