Thursday, April 25, 2024
Homeनाशिकनाशिकला आज स्मार्ट सिटीची राष्ट्रीय परिषद

नाशिकला आज स्मार्ट सिटीची राष्ट्रीय परिषद

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनी, नाशिक महानगरपालिका आणि बीडब्ल्यू बिझनेस वर्ल्ड यांच्या संयुक्त विद्यमाने आज (दि.२८) नाशिक शहरात देशपातळीवरील आठवी स्मार्ट सिटी परिषद होत आहे. नवीन नाशिक भागातील पाथर्डी फाट्यावरील हॉटेल गेटवे येथे या एकदिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

- Advertisement -

स्मार्ट सिटी परिषदेत जबलपूर, औरंगाबाद, पुणे, ठाणे, अमरावती, अलीगढ, काकीनाडा, सोलापूर, जालंधर, लुधियाना आदी १६ स्मार्ट शहरांचे आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी व इतर अधिकारी प्रतिनिधी म्हणुन सहभागी होणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते सकाळी ९ वाजता परिषदेचे उद्घाटन होणार आहे.

याप्रसंगी महापौर सतीश कुलकर्णी, स्मार्ट कंपनीचे अध्यक्ष सीताराम कुंटे, विभागीय महसुल आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील आदींसह पुणे, औरंगाबाद, अमरावती, सोलापूर महापालिकांच्या आयुक्तांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

या कार्यशाळेत विविध स्मार्ट शहरांचे प्रतिनिधी, उद्योग जगतातील प्रतिनिधी तसेच नाशिक शहरातील विविध क्षेत्रांशी संबंधित प्रतिनिधींचा सहभाग असणार आहे. यात स्मार्ट शहरात राबविण्यात येत असलेले प्रकल्प, या नवीन प्रकल्पांची माहिती देवाण घेवाण यात केली जाणार आहे. यामुळे स्मार्ट सिटीच्या कामाना गती मिळावी व नवीन प्रकल्प राबविण्याचे राबविण्याचे काम व्हावे असा उद्देश या परिषदेच्या मागील आहे.

स्मार्ट सिटी अभियानांर्तगत भविष्यातील स्मार्ट शहरांचे निर्माण, माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी व फायदेशीर वापर, स्मार्ट शहरांना कनेक्टेड आणि इंटिग्रेटेड परिसंस्थांसाठी पायाभूत सोयी सुविधा व वाहतूक यंत्रणा, स्मार्ट आणि हरित शहरांच्या निर्मितीमध्ये ऊर्जा, पाणी, सौर ऊर्जा आणि पर्यावरण यांचा सहभाग, स्मार्ट शहरांच्या बांधणीसाठीच्या इंटेलिजन्ट व त्वरित प्रतिसादासह सुरक्षिततेसाठीचे तंत्रज्ञान, शाश्वत व राहण्यायोग्य शहरांमधील बॅँकिंग, शिक्षण, कौशल्यविकास, आरोग्य आणि नागरी सुविधा यांचा वाटा आदी विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या