सिन्नर : सोनांबेतील डॉ. गारे यांची आत्महत्या
स्थानिक बातम्या

सिन्नर : सोनांबेतील डॉ. गारे यांची आत्महत्या

Abhay Puntambekar

सिन्नर । प्रतिनिधी

उद्योगभवन जवळील अशोका बिल्डकॉनच्या ७ व्या मजल्यावरुन उडी मारुन डॉक्टरने आत्महत्या केल्याची घटना आज (दि.१३) सायं.५ वाजेच्या दरम्यान घडल्याने खळबळ उडाली आहे.

तालुक्यातील दातली येथील डॉ. गोविंद एकनाथ गारे (४०) हे सोनांबे येथे प्रॅक्टीस करत होते. दरम्यान, सायंकाळी ५ वाजेच्या दरम्यान डॉ. गारे यांनी आत्महत्या केल्याचे वृत्त सर्वत्र पसरले. नगरपालिका रुग्णालयात मृतदेह शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आला. डॉ. गारे यांच्या मृत्यूने हळ-हळ व्यक्त करण्यात येत आहे.

Deshdoot
www.deshdoot.com