पाथरे चा भूमिपुत्र शुभम गव्हाणे अमेरिकेत ‘टीम ब्रह्मास्त्र’ चे करणार नेतृत्व
स्थानिक बातम्या

पाथरे चा भूमिपुत्र शुभम गव्हाणे अमेरिकेत ‘टीम ब्रह्मास्त्र’ चे करणार नेतृत्व

Abhay Puntambekar

पाथरे | वार्ताहर

सिन्नर तालुक्यातील पाथरे गावचे भूमिपुत्र शुभम योगेश गव्हाणे हे अमेरिकेत अभियांत्रिकीच्या नवोदित शास्त्रज्ञांच्या होणाऱ्या स्पर्धेत के के वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संघाचे नेतृत्व करणार आहे

सोसायटी ऑफ ऑटोमॅटि व्ह इंजीनियर्स आणि महिंद्रा अँड महिंद्रा यांच्यावतीने इंदोर येथे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावरील ब्रह्मास्त्र स्पर्धेत के के वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या टीम ब्रह्मास्त्र रेसिंग या संघाने मनुवर बिलिट या विभागात अव्वल क्रमांक पटकावला तर या स्पर्धेच्या मुख्य प्रकारात संपूर्ण देशात सातवा क्रमांक मिळवला

ही स्पर्धा सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजीनियर्स आणि महिंद्रा अँड महिंद्रा यांच्यामार्फत आयोजित केली जाते ही स्पर्धा अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी देशातील एक महत्त्वपूर्ण स्पर्धा मानली जाते के के वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या टीम ब्रह्माने या स्पर्धेत संपूर्ण भारतातून पहिला क्रमांक मिळविला.

या मध्ये पूर्ण रस्ता अतिशय खडतर बनविला जातो ज्यात संपूर्ण रस्त्यात मोठ्या खड्ड्यातून आणि उंच व त्यातून चालकाला गाडी वळवत द्यावी लागते येथे ये चालकाच्या कौशल्याची पराकाष्टा लागते या स्पर्धेत संघाचे नेतृत्व शुभम गव्हाणे यांनी केले होते चालक ऋषिकेश खोर खेडे यानेही स्पर्धा अवघ्या ४१’४२ सेकंदात पूर्ण केली ज्यामुळे संघाला पहिल्या क्रमांकाच्या पुरस्कार बरोबरच रोख सात हजार रुपये बक्षीस देण्यात आले

या संघाची अमेरिका येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झाली असून स्पर्धेत जगातील शंभर उत्कृष्ट संघांचा सहभाग असणार आहे संघाची या स्पर्धेसाठी तयारी सुरू झाली असून हा संघ लवकरच अमेरिकेला रवाना होणार आहे मेकॅनिकल प्रोडक्शन आणि इलेक्ट्रॉनिक शाखेतील 32 विद्यार्थ्यांनी अतिशय खडतर परिश्रम घेऊन ही गाडी तयार केली होती वर्षभराच्या मेहनतीनंतर शुभम गव्हाणे यांच्या नेतृत्वाखाली हा संघ भारताचे नेतृत्व करत आहे.

शुभम च्या यशाबद्दल पाथरे  येथील अनेक मान्यवरांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिले आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com