Friday, April 26, 2024
Homeनाशिकईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशिनसाठी १०.७८ कोटींचे गोदाम

ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशिनसाठी १०.७८ कोटींचे गोदाम

नाशिक । प्रतिनिधी

अंबड औद्योगिक वसाहतीतील धान्य गोदामात ठेवल्या जाणार्‍या ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीन ठेवण्यासाठी स्वतंत्र गोदाम बांधण्यात येणार असून १०.७८ कोटींच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. लवकरच यासंदर्भात ई निविदा काढण्यात येणार आहे.

- Advertisement -

सामान्य प्रशासन विभागाने १७ जानेवारी २०२० रोजी ईव्हीएम साठवणुकीसाठी गोदाम बांधकामास प्रशासकिय मान्यता दिली आहे. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाकडून शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत छाननी व तांत्रिक सहमतीसह १० कोटी ७८ लाख २७ हजार रुपये किंमतीच्या प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी आला होता. त्यास नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे.

या गोदामात स्टाफ रूम, गार्ड रूम, स्ट्रॉग रूम, पब्लिक टॉयलेट व फर्निचर, वॉल कंपाऊंड, अंतर्गत रस्ते, सपाटीकरण, पाणीपुरवठा, स्वच्छतागृह, पंप, विद्युतीकरण अशा कामांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. निवडणूक आयोगांच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार कमीत कमी खर्चात गुणवत्तापूर्ण काम होईल यांची जबाबदारी जिल्हाधिकारी यांच्यावर टाकण्यात आली आहे. हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावेत, याकरिता सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात येणार नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या