उत्पादन शुल्कच्या कारवाईत लाखोंचा मद्यसाठा जप्त
स्थानिक बातम्या

उत्पादन शुल्कच्या कारवाईत लाखोंचा मद्यसाठा जप्त

Abhay Puntambekar

नाशिक । प्रतिनिधी

दिंडोरी रोड येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत दादरा नगर हवेलीनिर्मित मद्याच्या १०० खोक्यांसह वाहतुकीसाठी वापरली गेलेली पिकअप असा १७ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात यश आले आहे.

दरम्यान, अंधाराचा फायदा घेऊन संशयित पिकअप चालक पसार झाल आहे. म्हसरूळ-दिंडोरी रोडने पररज्यातील मद्याची वाहतुक केली जाणार असल्याची माहिती, उत्पादन शुल्क विभागाच्या अ विभागास मिळाली होती. त्यानुसार पथकाने वरील मार्गावर सापळा रचला.

त्यावेळी एमएच ४८ एजी २२१० या क्रमांकाच्या महिंद्रा पिकअप वाहनावर पथकाला संशय आल्याने, ते अडविण्यात आले. या वाहनाची तपासणी केली असता, त्यात ब्लेंडर्स प्राईड, रॉयल चॅलेंज, रॉक फोर्ड, क्लार्सबर्ग बिअर, ग्रीन्किंग, व्होडका, इम्पेरिअल ब्ल्यू विस्की, बडवायझर बिअर व ऑफिसर चॉईस असा बिअर व मद्याचे १०० खोके आढळून आले.

या प्रकरणी पसार चालकाविरूद्ध दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई विभागीय उपायुक्त अर्जुन ओहोळ, अधिक्षक मनोहर अंचुळे, उपअधिक्षक बी. एन. भुतकर यांच्या निर्देशाने निरीक्षक वसंत कौसडीकर, पथकाचे निरीक्षक ऋषिकेश फुलझळके, दुय्यम निरीक्षक डी. एन. पोटे, योगेश चव्हाण, सी. एच. पाटील, प्रविण ठाकरे, जवान गौरव तारे, आर. बी. झनकर, एस. ए. माने, व्ही. एच. चव्हाण यांनी केली.

Deshdoot
www.deshdoot.com