सातपूर : महादेववाडीतील अतिक्रमणावर मनपाचे डिमार्केशन; कारवाईच्या भितीने नागरीक हवालदिल
स्थानिक बातम्या

सातपूर : महादेववाडीतील अतिक्रमणावर मनपाचे डिमार्केशन; कारवाईच्या भितीने नागरीक हवालदिल

Abhay Puntambekar

नाशिक | प्रतिनिधी

सातपूर विभागातील शिवम टॉकीजकडे जाणार्‍या महापालिकेच्या डीपी रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यासंदर्भात काल मनपा प्रशासनाने पून्हा नव्याने ‘डिमार्केशन’ केले असून, या माध्यमातून रस्ता मोकळा करण्याच्या दिशेने मनपा प्रशासनाने सूरू केलेल्या कारवाईमुळे परिसरातील नागरीकांमध्ये तीव्र नाराजीचा सूर दिसून येत होता. याप्रकरणी उच्च न्यायालयात दावा दाखल केलेला असल्याचे सांगून नागरीक ही प्रक्रीया रोखण्याचा केविलवाणा प्रयोग करताना दिसून येत होते.

सातपूर विभागातील शिवम टॉकीजकडे जाणार्‍या महापालिकेच्या डीपी रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यासंदर्भात दरखास्तीवर दिवाणी न्यायालयाने थेट खुर्च्या व टेबल जप्त करण्याच्या दिलेेल्या आदेशामुळे गुरुवारी महापालिका प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. अखेर आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी अतिक्रमण उपायुक्त मनोज घोडे पाटील यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर शुक्रवारपासूनच संबंधित अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू करण्याचे लेखी आश्‍वासन न्यायालयाला देण्यात आले. या पार्श्‍वभूमीवर काल मोहीम हाती घेण्यात आली.

सातपूर महादेववाडी परिसरात सकाळी ११ वाजेचया सूमारास दोन जेसीबी तीन ट्रक व कर्मचार्‍यांच्या ताफ्यासह बनपा कर्मचारी दाखल झाले होते. यावेळी अतिक्रमण उपायुक्त जयश्री सोनवणे यांच्यासह मनपाच्या सहाही विभागाचे विभागिय अधिकारी, नगररचना विभागाचे अधिकारी व कर्मचार्‍यांच्या माध्यमातून परिसरातील अतिक्रमीत घरांची नोंदणी करुन त्यावर रेड मार्क करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. या परिसरातून रस्ता देण्यासाठी एकूण ६९ घरांवर जेसिबी फिरण्याची शक्यता दिसून येत आह.

या ‘डिमार्केशन’ नंतर मात्र नागरीकांचा आक्रोश दिसू लागला होता. आपला निवारा जाण्याच्या भितीने नागरीक हवालदिल झाल्याचे चित्र होते. दुपारपर्यंत प्रशासनाने डिमार्केशन पूर्ण केल्यानंतर पूढच्या कारवाईसाठी वरिष्ठ पातळीवरुन नियोजन केले जाणार असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.

बंदोबस्तात कारवाई
डीमार्केशन नंतर याचा सविस्तर अहवाल तयार केला जाईल घरमालक त्यात राहणारे नागरीक यांची इत्यंभूत माहीती सादर करुन त्यानंतर पोलिस बंदोबस्तात कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Deshdoot
www.deshdoot.com