Thursday, April 25, 2024
Homeनाशिकजिल्ह्याला ७६ कोटी १४ लाखांचा वाढीव निधी

जिल्ह्याला ७६ कोटी १४ लाखांचा वाढीव निधी

नाशिक । प्रतिनिधी

पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जिल्ह्यासाठी १८५ कोटी जादा निधीची मागणी केली होंती. उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (दि.३१) झालेल्या आढावा बैठकीत त्यापैकी वाढीव ७६ कोटी १४ लाखांचा निधीला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना २०२०-२१ चा आराखडा हा ४२५ कोटी पर्यंत पोहचला आहे.

- Advertisement -

सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना २०२०-२१ मध्ये नाशिक जिल्ह्यासाठी शासनाने रुपये ३४८.८६ कोटीची आर्थिक मर्यादा दिलेली होती. मात्र नाशिक जिल्ह्यातील विविध क्षेत्रात करावयाच्या कामांबाबत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी वाढीव निधीची मागणी केलेली होती. त्यानुसार आपण रुपये ७६.१४ कोटी इतका नियतव्यय वाढवून एकूण रुपये ४२५ कोटी भरीव नियतव्यय मंजूर केला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने नगर उत्थान, ग्राम विकास योजना, शाळा व अंगणवाडी दुरुस्ती व बांधणी, यात्रा स्थळे व पर्यटन स्थळांंचा विकास, पोलिस यंत्रणा आधुनिकीकरण अांदी कामांचा समावेश आहे.

भुजबळ यांनी बैठकीत नाशिक हा राज्यातील तिसरा मोठा जिल्हा असून लोकसंख्या ६१ लाख इतकीआहे. १३८२ ग्रामपंचायती, २ महानगरपालिका, ९ नगरपालिका, ६ नगरपंचायती इतक्या मोठ्या संख्येने स्थानिक स्वराज्य संस्था आहेत. त्यामुळे शासनाने कळविलेल्या नियतव्ययात वाढ होणे गरजेचे असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. त्यानुसार लोकप्रतिनिधींची मागणी व विविध क्षेत्रात करावयाची कामे विचारात घेता महाराष्ट्र नगरोत्थान महाअभियासाठी वाढीव २ कोटी, इतर जिल्हा रस्ते विकास व मजबुतीकरण करण्यासाठी ८ कोटी, ग्रामीण रस्ते विकास व मजबुतीकरण करण्यासाठी ८ कोटी, प्राथमिक शाळांची विशेष दुरुस्तीसाठी २.१४ कोटी, शाळांच्या इमारतीसाठी १२ कोटी, वीज वितरण कंपनीस सहाय्यक अनुदान २ कोटी, अंगणवाडी बांधकामासाठी ४ कोटी, यात्रास्थळ विकासासाठी १ कोटी, लघु पाटबंधारे १०० हेक्टरसाठी ४ कोटी, पोलीस व तुरुंग यांना पायाभूत सुविधांसाठी ३ कोटी असे एकूण ४६.१४ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

इगतपुरी हिलस्टेशनसाठी १ कोटी
गंगापूर बोट क्लबसाठी १ कोटी, कलाग्रामसाठी ५ कोटी, शिवाजी स्टेडीयमसाठी ८ कोटी, नाशिक जिल्हा १५० वर्ष पूर्ती कार्यक्रमासाठी ५ कोटी, साहसी खेळांच्या प्रशिक्षण केंद्रासाठी १ कोटी तर इगतपुरी हिल स्टेशन विकासासाठी १० कोटी अशा या जिल्ह्यात महत्वकांक्षी विशेष प्रकल्पांसाठी ३० कोटींचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या