रेल्वे लाईनचे निरीक्षण करणाऱ्या चाचणी उपकरणाला साकेत एक्स्प्रेसची धडक
स्थानिक बातम्या

रेल्वे लाईनचे निरीक्षण करणाऱ्या चाचणी उपकरणाला साकेत एक्स्प्रेसची धडक

Abhay Puntambekar

नांदगाव । प्रतिनिधी

नांदगाव मनमाड रेल्वे सेक्शन मधील हिसवळ ते पांझन दरम्यान रेल्वे लाईनचे निरीक्षण करणाऱ्या चाचणी उपकरणाला मनमाडहुन भुसावळच्या दिशेने जाणाऱ्या साकेत एक्सप्रेसने धडक दिल्याने चाचणी उपकरणाला मोठ्या प्रमाणावर  नुकसान झाल्याचे समजते या कारणावरून सात कर्मचाऱ्यांचे निलंबन झाल्याचे कळते.

या बाबत मिळालेल्या माहिती नुसार हिसवळ पांझन दरम्यान रेल्वे लाईनचे निरीक्षण करणाऱ्या चाचणी उपकरणाला साकेत एक्सप्रेस ने धडक दिल्याने त्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून याप्रकरणी रेल्वेच्या सात कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे समजते यामध्ये मनमाड येथील हे कर्मचारी आहे असे कळते. परंतु रेल्वेच्या संबंधित विभागाकडून कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. दरम्यान साकेत एक्स्प्रेसच्या चालकाने प्रसंगावधान राखत गाडी नियंत्रणात आणत पुढील होणारा मोठा अनर्थ टाळला.

Deshdoot
www.deshdoot.com