Tuesday, April 23, 2024
Homeनाशिकआरटीई : पाच हजार जागांसाठी १३ हजार अर्ज

आरटीई : पाच हजार जागांसाठी १३ हजार अर्ज

अनेकांचे अर्ज होणार बाद; ‘आरटीईर्’साठी प्राधान्यक्रम

नाशिक । प्रतिनिधी

- Advertisement -

बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) खासगी शाळांतील २५ टक्के जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू असून, बुधवारी (दि.२६) सायंकाळपर्यंत यंत्रणेकडे १२ हजार ८४० अर्ज दाखल झाले.

जिल्ह्यातील ४४७ शाळांमध्ये ५ हजार ५५३ जागा असून प्राप्त अर्जांचे प्रमाण अडीच पटींनी अधिक आहे. दरम्यान इच्छुक व पात्र विद्यार्थ्यांच्या नावाने अर्ज भरण्याची शनिवार (दि.२९) पर्यंत मुदत असल्याने अर्ज संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

आर्थिकदृट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना नामांकित शाळांमध्ये शिकण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनातर्फे ही योजना राबविली जाते आहे. शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत खासगी शाळांमध्ये याकरीता पंचवीस टक्के जागा राखीव ठेवल्या जातात.

शैक्षणिक वर्ष २०२०-२१ च्या प्रवेशाकरीता गेल्या १२ फेब्रुवारीपासून अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरवात झाली होती. त्यास पालकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद देतांना ऑनलाइन अर्ज दाखल केले जात आहेत. जिल्ह्यात असलेल्या ४४७ शाळांमध्ये ५ हजार ५५३ जागा उपलब्ध असून या जागांसाठी बुधवारी साडेबारा हजाराहून आधिक अर्ज दाखल झाले आहे.

गेल्या शैक्षणिक वर्षात जिल्ह्यातील साडेपाच हजार जागांसाठी सुमारे नऊ हजार अर्ज दाखल झाले होते. यावर्षी अर्ज संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे पाहायला मिळते आहे. दरम्यान सध्याच्या वेळापत्रकानुसार शनिवार (दि.२९) पर्यंत अर्ज करण्याची संधी आहे. तर येत्या ११, १२ मार्चला सोडत काढली जाणार असून, त्याआधारे प्रवेश दिले जाणार आहेत.

राज्यात दीड लाख अर्ज
राज्यातील ९ हजार ३२८ शाळांमधील १ लाख १५ हजार जागांसाठी १ लाख ६८ हजार पाल्यांची नोंदणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, नागपूरमधून ६ हजार ७९७ जागांसाठी २१ हजार २०० असे चारपट अर्ज आले आहेत. हा राज्यातील सर्वाधिक अर्ज नोंदणीचा आकडा आहे.

शेकडो अर्ज होणार बाद
जिल्ह्यातून दाखल केलेल्या अर्जांची संख्या उपलब्ध जागेच्या अडीच पट आहे. दरम्यान, यंत्रणेकडून मुख्य प्रक्रिया सुरू झाल्यावर अर्जदाराचे लोकेशन, घर ते शाळा अंतर, अन्य कागदपत्रे पडताळून व प्राधान्यक्रम पाहून विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित केले जाणार आहे. या प्रक्रियेत शेकडो अर्ज बाद होणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या