रेड क्रॉस सिग्नल ते रविवार कारंजा मार्ग पुन्हा ‘एकेरी’ मार्ग
स्थानिक बातम्या

रेड क्रॉस सिग्नल ते रविवार कारंजा मार्ग पुन्हा ‘एकेरी’ मार्ग

Abhay Puntambekar

नाशिक । प्रतिनिधी

अशोक स्तंभ येथील स्मार्ट रस्त्याच्या कामामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रविवार कारजा ते रेड क्रॉस सिग्नल या एकेरी मार्गावरून दुहेरी वाहतुक सुरू करण्यात आली होती. मात्र, आता स्मार्ट रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्याने येथील दुहेरी वाहतुक बंद करून पूर्ववत करण्यात आली आहे.

मात्र, शहरातील वाहनधारकांना गेल्या दोन महिन्यांपासून या दुहेरी मार्गावरून जाण्याची सवय झाल्याने त्यांच्याकडून अजूनही या मार्गाचा वाहतूकीसाठी वापर सुरू आहे. मात्र ही बाब लक्षात आल्यावर शहर वाहतूक शाखेने येथे शुक्रवारी (दि.३१)वाहतूक पोलीसाची नियुक्ती करून वाहतूक नियंत्रण करण्याची जबाबदारी टाकली आहे.

वाहनधारकांना या मार्गावरून जाण्याची सवय लागल्याने ते बेशिस्त पद्धतीनेच वाहने परशुराम सायखेडकर नाट्यग़ृहाकडून थेट रेडक्रॉस सिग्नलमार्गे रविवार कारंजाकडे वळवित आहे. येथे नेमलेल्या वाहतूक पोलीस कर्मचार्‍याला येथून जाणार्‍या प्रत्येक वाहनधारकांना हा मार्ग आता एकेरी करण्यात आल्याचे सांगावे लागत असून वाहनधारकांना दुसर्‍या मार्गाने जाण्यास सांगावे लागत आहे. त्यामुळे वाहतूक नियमनासह लोकांना एकच गोष्ट वारंवार सांगावी लागत असल्याने कर्मचार्‍याची धावपळ उडत आहे.

Deshdoot
www.deshdoot.com