ना. रामदास आठवले आज नाशकात
स्थानिक बातम्या

ना. रामदास आठवले आज नाशकात

Abhay Puntambekar

नाशिक । प्रतिनिधी

केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री रामदास आठवले हे बुधवारी (दि.२२) नाशिक दौर्‍यावर आहेत. दुपारी तीन वाजता ते मुबंईहून नाशिकला पोहचतील. शासकीय विश्रामगृह येथे त्यांचे आगमन होईल. त्यानंतर दुपारी चार वाजता नाशिकरोड येथील विभागीय आयुक्तालयात ते विविध विभागाचा आढावा घेणार आहेत.

प्रधानमंत्री आवास योजना, अटल पेंशन योजना, जनधन योजना, प्रधानमंत्री जीवन बीमा ज्योती योजना, मुद्रा योजना, उज्वला योजना यांसह विविध योजनांच्या प्रगतीची माहिती घेतील.बैठकीला विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सह इतर विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहे. बैठकीनंतर ते पत्रकार परिषदेला संबोधित करतील. रात्री ते विश्रामगृहात मुक्कामी राहणार आहे.

Deshdoot
www.deshdoot.com