१९ जानेवारीला पल्स पोलिओ लसीकरण मोहीम
स्थानिक बातम्या

१९ जानेवारीला पल्स पोलिओ लसीकरण मोहीम

Abhay Puntambekar

नाशिक | प्रतिनिधी

शासनाच्या  सुचनेनुसार नाशिक महानगरपालिका क्षेत्रात दि. १९ जानेवारी २०२०  रोजी मा.आयुक्त यांचे मार्गदर्शनाखाली पल्स पोलिओ मोहिम राबविली जाणार असून, सदर मोहिमेचे उद्घाटन मा. महापौर यांचे शुभहस्ते होणार आहे

या मोहिमेसाठी म.न.पा. क्षेत्रात एकुण ७१३ बुथ, ९४ ट्रान्झिट टिम, ४४ फिरते पथक, ६ नाईट टिम अशी यंत्रणा उभारण्यात आली आहे. यासाठी एकुण ३४३३ कर्मचारी, ८७५ पर्यवेक्षक, प्रभाग अधिकारी म्हणुन सहा.वैद्यकिय (आरोग्य) अधिकारी, पशु वैद्यकिय अधिकारी, जीवशास्त्रज्ञ, मुख्य वैद्यकिय अधिकारी, वैद्यकिय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

बुथवरील दि.१९ जानेवारी २०२०  च्या कामानंतर शहरात प्रत्येक घरोघरी जाऊन मुलांना डोस दिल्याची खात्री करुन घेण्यात येईल व राहिलेल्या बालकांना डोस पाजण्यात येईल. ही कार्यवाही सलग ५ दिवस चालेल. त्यासाठी एकुण ६७५ टिम व १४८ आय.पी.पी.आय. पर्यवेक्षक काम करतील. प्रत्येक टिममध्ये दोन कर्मचारी असतील व प्रत्येक ५ टीमकरीता एक पर्यवेक्षक त्या कामाचे मुल्यमापन करतील. या सर्व कामाचा आढावा एकत्रितरित्या शासनास कळविणेत येईल.

म.न.पा., श.प्रा.आ.केंद्र वैद्यकिय अधिकारी, परिचारिका, कर्मचारी, विभागीय अधिकारी तसेच खाजगी सहा. परिचारिका, मनपा अंगणवाडी/आय.सी.डी.एस. परिचारीका, सेविका, मदतनिस, वैद्यकिय महाविद्यालयीन, नर्सिंग कॉलेज विद्यार्थी, इतर सेवाभावी संस्था, रोटरी क्लब, लायन्स क्लब, मनपा शिक्षण मंडळ, जिल्हा मलेरिया विभाग, खाजगी वैद्यकिय व्यावसायिक इ. मोहिम कार्यान्वीत करणेकामी सहकार्य करणार आहेत.

उर्वरित बालकांना दि. २० जानेवारी २०२० ते २४ जानेवारी २०२० दरम्यान घरोघरी जाऊन कर्मचारी पोलिओ लस देतील. तरी नागरीकांनी सहकार्य करावे, असे आवाहन मा. आयुक्त श्री. राधाकृष्ण गमे व वैद्यकिय (आरोग्य) अधिकारी डॉ.श्री.नितीन रावते साो. यांनी केले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com