Thursday, April 25, 2024
Homeनाशिकराज्यातील २० टक्के अनुदानास पात्र शाळांसाठी १४५ कोटीची तरतूद

राज्यातील २० टक्के अनुदानास पात्र शाळांसाठी १४५ कोटीची तरतूद

नाशिक । प्रतिनिधी

राज्यातील १३ सप्टेंबर २०१९ मध्ये अनुदानास पात्र घोषित केलेल्या खाजगी प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, तुकड्यांना व शाखांना २० टक्के अनुदान उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी लागणारा १४४ कोटी ९७ लाख ५६ हजार इतका निधी विभागाकडे असलेल्या निधीतून भागविला जाणार आहे.त्यासाठीची तरतूद पुरक मागणीव्दारे सादर केली असल्याची माहिती आमदार किशोर दराडे यांनी दिली.

- Advertisement -

शासनाने नमूद केलेल्या निकषांची पूर्तता करणार्‍या, सुरुवातीस कायम विना अनुदानित तत्वावर मान्यता दिलेल्या व नंतर कायम शब्द वगळलेल्या, मूल्यांकनात पात्र ठरलेल्या व अनुदानास पात्र घोषित केलेल्या खाजगी प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, तुकड्यांना व शाखांना २० टक्के अनुदान उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

निकषांची पूर्तता करणार्‍या शाळांची यादी वित्त विभागाच्या मान्यतेनंतर विभागाने विहित पद्धतीने अंतिम करणे आवश्यक आहे. यासाठी १४४ कोटी ९७ लाख ५६ हजार एवढा निधी खर्च अपेक्षित आहे.हा खर्च चालू वित्तीय वर्षातच्या मंजूर अनुदानातून भागविणे शक्य आहे.हा खर्च विधान मंडळाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी ३ व १ हजार (टोकन निधी) पूरक मागणीद्वारे सादर करण्यात आली आहे.

दि.१३ सप्टेंबर २०१९ नुसार राज्यातील २७६ प्राथमिक शाळा,१०३१ तुकड्यांवरील २८५१ शिक्षक शिक्षकेतर सेवक,१२८ माध्यमिक शाळा, ७९८ तुकड्यांवरील २१६० शिक्षक शिक्षकेतर सेवक तसेच १७७९ उच्च माध्यमिक शाळा,५९८ तुकड्या, १९२९ अतिरिक्त शाखांवरील ९८८४ शिक्षक शिक्षकेतर सेवक अशा एकूण १४,८९५ शिक्षक शिक्षकेतर सेवकांंना २० टक्के अनुदान एप्रिल-२०१९ पासून मिळणार असल्याची माहिती आ.दराडे यांनी दिली.

अंशतःअनुदानित शाळांना अनुदान
सध्या २० टक्के अनुदान घेत असलेल्या अंशतः अनुदानित २४१७ माध्यमिक शाळा व ४५६१ तुकड्यांवरील २८,२१७ शिक्षक शिक्षकेतर सेवकांना वाढीव २० टक्के अनुदान वितरीत करण्याचा शासन आदेश याच आठवड्यात निर्गमित होईल, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आल्याने त्यास विधिमंडळाच्या मान्यतेची आवश्यकता नाही.शासनाने घेतलेल्या निर्णयाप्रमाणे वाढीव टप्पा अनुदानही मिळेल.
-आमदार किशोर दराडे

- Advertisment -

ताज्या बातम्या