Thursday, April 25, 2024
Homeनाशिकनविन नाशिक मध्ये आढळले प्लास्टिक सदृश्य अंडे

नविन नाशिक मध्ये आढळले प्लास्टिक सदृश्य अंडे

नवीन नाशिक । निशिकांत पाटील 

नवीन नाशिक परिसरात प्लास्टीकसदृश अंडे आढळून आल्याने परिसरात खळबळ पसरली आहे.पाटीलनगर येथील रहिवाशी सतीश शिंगोटे यांनी काल (दि.८) रात्री आपल्या मुलाला अंडे आणण्यासाठी दुकानात पाठवले. त्यांचा मुलगा अंडी घेऊन आला. ही अंडी वाटीमध्ये फोडून टाकल्यानंतर त्याचा पिवळा बलक हा वेगळ्या स्वरुपाचा असल्याचा शिंगोटे यांना आढळून आला.

- Advertisement -

दरम्यान, त्यांनी सदर अंड्याचा बलक हा हातात घेतला असता तो चेंडूसारखा हातावर रेंगाळत असल्याचे त्यांना दिसून आले. तसेच अंड्याला जो गंध असतो तो गंध या बलकामध्ये दिसून येत नव्हता. त्यांनी या सर्व प्रकाराचा व्हिडिओ काढून ठेवला होता. आता नवीन नाशिक व परिसरामध्ये हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

दरम्यान, अन्न व औषध प्रशासनाने याप्रश्नी निश्चित अशी खात्री करून संबंधित प्लास्टीकसदृश अंडी नेमकी कुठे बनवली जातात याची चौकशी करणे गरजेचे आहे व अशा प्रकारे भेसळ करणार्‍या रॅकेटचा पर्दाफाश करण्याची मागणी होत आहे.

नागरिकांच्या जीवाशी खेळणार्‍या अशा व्यावसायिकांवर कारवाई होणे गरजेचे आहे. सोशल मीडियावर यापूर्वी अशा स्वरुपातला व्हिडिओ बघितला होता. मात्र आज स्वत:लाच हा अनुभव आल्याने यापुढे अंडी खाणे बंद करावे लागेल. संबंधित प्रशासनाने याप्रश्नी गांभिर्याने दखल घेऊन परिसरात चौकशी करावी व लोकांचा जीव धोक्यात टाकण्यापासून वाचवावा.
सतीश शिंगोटे

- Advertisment -

ताज्या बातम्या