Saturday, April 27, 2024
Homeनाशिकनाशिक शहरात निसर्गाच्या प्रकोपाने दाणादाण; २ डझन वृक्ष कोसळले

नाशिक शहरात निसर्गाच्या प्रकोपाने दाणादाण; २ डझन वृक्ष कोसळले

वादळी वारा – मुसळधार पावसाने नाशिककरांना झोडपले

नाशिक । प्रतिनिधी

- Advertisement -

करोनाच्या संकटाला सामोरे जात असतांनाच बुधवारी आलेल्या निसर्ग चक्रीवादळाने पश्चिम किनारपट्टीस तडाखा दिल्यानंतर नाशिक जिल्ह्यात मोठे नुकसान केले. बुधवारी सायंकाळी आलेल्या चक्रीवादळाचा मोठा फटका नाशिक शहराला बसला असुन शहरात २ डझनपेक्षा जास्त झाडे उन्मळून पडले असुन शेकडो झाल्याच्या फांद्या मोडून रस्त्यावर पडल्या. तर शहरात दोन ठिकाणी घराच्या भिती कोसळल्या असुन या पडझडीतून दोन ठिकाणी डीपीला आग लागल्याच्या घटना घडल्या. महापालिका अग्निशमन दलाकडुन तातडीने मदत कार्य करण्यात येऊन रस्ते मोकळे करुन देण्यात आले असुन आजही झाडाची पडझड सुरू होती.

निसर्ग चक्रीवादळाच्या आगमनापुर्वीच नाशिक जिल्ह्यात बुधवारी सकाळपासुन पाऊस सुरू झाला होता. यात नाशिक शहरात मुसळधार व रिमझीम पाऊस पडत असतांनाच सायंकाळी सुसाट वार्‍यासह सुरु झालेल्या मुसळधार पाऊसाने नाशिककरांची मोठी धावपळ उडवून दिली. प्रचंड वेगात वाहणार्‍या वार्‍यासोबत आलेल्या जोरदार पाऊसाचे रौद्र रुपाने आलेल्या निसर्ग चक्रीवादळाने नाशिककरांना दर्शन दिले. या निसर्गाच्या रौद्र रुपामुळे रस्त्यारवरील वाहतुक थांबली जाऊन शहरातील रस्ते निर्मनुष्य झाले.

अगोदरच जिल्हा प्रशासनाकडुन सतर्कतेचा इशारा देण्यात आल्याने नागरिकांनी घरात बसणे पसंत केले. शहरात सायंकाळी सहा वाजेपासुन चक्रीवादळाचे तांडव सुरू झाल्यानंतर सुसाट वादळी वार्‍याच्या आवाजाने नागरिकांनी धडकी भरविली. वादळी वार्‍यामुळे घराजवळील झाडे फांद्या कोसळण्याचा आवाज नागरिकांनी ऐकला. तर काही ठिकाणी झाडांच्या फांदा विद्युत वाहिनी व डीपी वर पडल्याने शार्ट सर्किट होऊन विद्युत पुरवठा खंडीत झाला. तसेच शहरात दोन ठिकाणी डीपीला आग लागल्याचे प्रकार घडले. तसेच शहरात दोन ठिकाणी घराच्या भिंत्ती कोसळल्या आणि काही ठिकाणी मुसळधार पाऊसाचे पाणी घरात शिरले.अशाप्रकारे शहरातच चक्रीवादळाचे तांडव रात्री अकरा – बारा वाजेपर्यत सुरूच होते. आज (दि.४) पहाटेपर्यत सुरू असलेल्या पाऊसामुळे शहरात सकाळी देखील झाडे कोसळण्याचे प्रकार सुरु होते. तसेच वार्‍यामुळे मुळापासुन हललेली झाडे आज दुपारीपर्यत पडल्याचे कॉल महापालिका अग्निशमन दलाला मिळालेे.

वादळामुळे मनपा अग्निशमन दलाची कसरत
निसर्ग चक्रीवादळाने सायंकाळी पाच वाजेपासुन झाडे व फांद्या कोसळत असल्याचे कॉल नाशिक महापालिका अग्निशमन दलाला सुूरु झाले होते. वेगात असलेला वादळी वारा आणि मुसळधार पाऊसाच्या फटक्यामुळे शहरात झाडे – फांद्या, घराच्या भिंत्त कोसळणे, डीपीला आग, घरात पाणी शिरणे अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाला मिळाल्यानंतर तात्काळ त्या त्या विभागातील अग्निशमनचे पथक याठिकाणी जाऊन कोसळलेली झाडे बाजुला करीत होते. अशाप्रकारे वादळाच्या प्रकोपात पडलेली झाडे बाजुला करण्यासाठी जवानांना मोठी कसरत करावी लागली. या सर्व स्थितीवर अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी राजेंद्र बैरांगी परिस्थीतीवर लक्ष ठेवून होते.

झाडे व फांद्या कोसळल्याची ठिकाणे
* सुयोजीत लॉन्स कामगारनगर सातपूर (पहिला कॉल सायं. 5 वाजता)
* महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी समोर
* उपगर ना. रोड महाराष्ट्र बॅकेसमोर
* मेरी गोरक्षनगर पोकार इस्टेट
* सातपूर महिंद्रा कंपनीसमोर
* गंगापूररोड जेहान सर्कल जवळ
* गडकरी चौक एलआयसी समोर
* पाटील लेन 3 व 4 व विद्या विकास सर्कलजवळ
* त्रिवेणी पार्क शिवाजीनगर जेलरोड
* ओम रेसीडेन्सी केवडीबन पंचवटी
* हनुमान मंदिर तपोवन
* हेमलता टाकीज मागील गल्लीत
* सरकारवाडा पोलीस स्टेशनजवळ रस्त्यावर
* फुलेनगर तीन पुतळ्याजवळ झाडाच्या फांद्या कोसळल्या
* प्रेस्टीज इमारत संभाजीनगर उंटवाडी
* पारिजातनगर सिग्नलजवळ
* विजय ममता जवळ मुक्ताई हॉस्पिटल
* कॉलेजरोड माजी शहर अभियंता खुने यांच्या बंगल्याजवळ
* इंदिरानगर बापु बंगल्याजवळ
* जुने पोलीस आयुक्तालयासमोर एचडीएफसी बॅकेसमोर
* सिटी सेंटर मॉलजवळ
* सातपूररोड पत्रकार कॉलनी
* आरटीओ गोकुळ अपार्टमेंट
* राजसारथी अपार्टमेंट इंदिरानगर
* इंदिरानगर पाटील गार्डन

विद्युत ट्रान्सफार्मरला आगीच्या घटना
* शरद्रचंद्र पवार मार्केट जवळ डिपीला बुधवारी रात्री १२. ३० वाजता आग
* पंचवटीतील मेहरधाम भागात मध्यरात्री डीपीला आग

भिंत कोसळल्याच्या घटना
* पिंपळचौक खडकाळी परिसर भद्रकाली जुन्या वाड्याची भित्त कोसळली (बुधवारी रात्री ८ वाजता)
* आरटीओ गोरक्षनगर भागात बंद घराची भित्त कोसळली. (आज सकाळी ८ वाजता)

- Advertisment -

ताज्या बातम्या