राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धा : नाशिकच्या जतीनला रौप्य, ऋतू भामरेला २ कांस्य पदक
स्थानिक बातम्या

राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धा : नाशिकच्या जतीनला रौप्य, ऋतू भामरेला २ कांस्य पदक

Abhay Puntambekar

नाशिक | प्रतिनिधी 

हल्डवानी (उत्तराखंड) येथे २० ते २२ फेब्रुवारी दरम्यान खेळवल्या गेलेल्या राष्ट्रीय एमटीबी सायकलिंग स्पर्धेत जतीन जोशी या सायकलपटूने एक रौप्य पदक तर ऋतु भामरेने दोन कांस्य पदकांची कमाई केली आहे. या स्पर्धेत महाराष्ट्र संघाला सर्वसाधारण विजेतेपद मिळाले.

स्पर्धेच्या पहिल्या दिवशीच ऋतू भामरेने ज्युनियर मुलींच्या गटात (१४ वर्षाकखालील) टाईम ट्रायल स्पर्धेत ३१ मिनिट ३५ सेकंदात अतिशय खडतर मार्गावरील ही स्पर्धा पूर्ण करत पदक पटकावले. तर दुसऱ्या दिवशी मार्स स्टार्ट प्रकारात कांस्य पदकाची कमाई केली.

तर जतिन जोशी यास १७ वर्ष खालील मुलांमध्ये टाईम ट्रायल मध्ये रौप्य पदक मिळाले. त्याने ३९ मिनिट ५८ सेकंदात स्पर्धा पूर्ण केली.

हे दोघेही सायकलपटू नाशिक जिल्हा सायकलिंग संघटनेमध्ये खेळतात. २ फेब्रुवारी रोजी त्र्यंबकेश्वर येथे महाराष्ट्र राज्य संघ निवड झाली होती. यात महाराष्ट्र संघ निवड होऊन नाशिकच्या एकूण ९ खेळाडूंची निवड या स्पर्धेसाठी झाली होती.

या सर्व खेळाडूंना प्रशिक्षण सेंट्रल रेल्वेचे सायकलिंग प्रशिक्षक लीलाधर शेट्टी हे प्रशिक्षण देतात व नाशिक येथे सर्व खेळाडूंना मार्गदर्शन जिल्हा सायकलिंग संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र निंबाळते, नितीन नागरे व अॅड योगेश टिळे यांचे मार्गदर्शन खेळाडूंना मिळते.

Deshdoot
www.deshdoot.com