‘महाराष्ट्र केसरी’ हर्षवर्धन सदगीर यांंचे जल्लोषात स्वागत

‘महाराष्ट्र केसरी’ हर्षवर्धन सदगीर यांंचे जल्लोषात स्वागत

नाशिकरोड । प्रतिनिधी

नाशिकच्या हर्षवर्धन सदगीर यांनी  दैदिप्यमान कामगिरी करत ‘महाराष्ट्र केसरी’ किताब पटकाविल्यानंतर प्रथमच शहरात आल्याने हर्षवर्धन सदगीर यांचे  नाशिककरांनी जल्लोषात स्वागत करून नाशिकरोड ते भगुर विजयी मिरवणुक काढण्यात आली.

नाशिकरोड येथे दुपारी एक वाजेच्या दरम्यान हर्षवर्धन सदगीर येणार असल्याने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे युवा कार्यकर्ते, पहिलवान व खेळाडूंनी मोठी गर्दी केली होती. यावेळी फटाक्याच्या आतषबाजीत डीजेवर गीते लावून त्याचे स्वागत करण्यात आले. यावेळी हर्षवर्धन याने प्रथम राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला अभिवादन करुन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे दर्शन घेतले.

त्यानंतर खुल्या वाहनातून बिटको चौक, मुक्तीधाम, देवळालीगाव, विहीतगाव, देवळाली कँम्प, देवी मंदिर, भगुर अशी मिरवणुक काढण्यात आली. यावेळी भगूर व्यायामशाळेचे अ‍ॅड.गोरखनाथ बलकवडे, विशाल बलकवडे, माजी आमदार योगेश घोलप, नगरसेवक केशव पोरजे, राजेश फोकणे, विक्रम कोठुळे, किशोर जाचक, बापु सापुते, शिरीष लवटे, संतोष क्षीरसागर, गोरख खर्जुल, नितीन चिडे, गणेश कदम आदींसह क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com