‘सीआयआय’च्या कायझन स्पर्धेवर नाशिकचे वर्चस्व
स्थानिक बातम्या

‘सीआयआय’च्या कायझन स्पर्धेवर नाशिकचे वर्चस्व

Abhay Puntambekar

सातपूर । प्रतिनिधी

‘सीआयआय ‘च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या १५ व्या कायझन स्पर्धेत ‘कायझन एक्सलन्स अवॉर्ड फॉर कन्सिस्टन्सी’ हा सन्मानाचा पूरस्कार टीडीके इंडिया प्रा.लि.(नाशिक), महिंद्रा अँड महिंद्रा (नाशिक) व लार्सन अँड टुब्रो लि.(अहमदनगर) यांना देण्यात आला.तर मोठ्या उद्योग गटातील प्रथम पुरस्कार एबीबी इंडिया लिमिटेड(नाशिक)  तसेच लघु उद्योग गटात पहिला पुरस्कार नितेश उद्योग (नाशिक) यांनी पटकावला आहे.

उद्योगातील कायझन पद्धतींबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी स्पर्धांचे आयोजन केले जात आहे.गेल्या 15 वर्षांपासून पासून या स्पर्धांचे आयोजन केले जात आहे. या स्पर्धेत ६० कायझन संघांनी सहभाग घेतला होता. त्यात प्रामुख्याने नाशिक, औरंगाबाद, मुंबई, ठाणे, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर आणि सातारा येथून उद्योगांच्या संघांनी सहभाग घेतला होता. सीआयआयने कायझन कॉम्पिटीशनचे उद्घाटन सीआयआय कायझन अवॉर्ड कमिटीचे अध्यक्ष आणि महिंद्रा आणि महिंद्राचे महाव्यवस्थापक अनिल जंगले यांच्या हस्ते करण्यात आले.

मोठ्या श्रेणीतील विजेते प्रथम पुरस्कार एबीबी इंडिया लिमिटेड (नाशिक), द्वितीय पुरस्कार गोदरेज अँड बोयस मॅनुफॅक्चरिंग कंपनी लिमिटेड(मुंबई), तृतीय पुरस्कार सिएट लिमिटेड(नाशिक)या सोबतच मोठ्या श्रेणीतील स्पेशल ज्युरी अवॉर्डसाठी कमिन्स जनरेटर टेक्नॉलॉजीज लिमिटेड(पुणे), कोसो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (नाशिक),बजाज ऑटो लिमिटेड(पुणे) यांना देण्यात आला.

तर लघु व मध्यम श्रेणी गटातूनप्रथम पूरस्कार नितेश उद्योग (नाशिक), दुसरा पुरस्कार ताकशी ऑटो कॉम्पोनेंट्स (पुणे), तृतीय पूरस्कार (मोशन ड्राइव्हट्रॉनिक्स प्रायव्हेट लि. यांना देण्यात आला. याच श्रेणीतील स्पेशल ज्युरी अवॉर्ड एस बी रीशेलर्स (कोल्हापूर), युके मेटल इंडस्ट्रीज(नाशिक), क्वालिटी इंजिनीरिंग कंपनी(पुणे) यांना तर सन्मानाचा काइझन एक्सलन्स अवॉर्ड फॉर कन्सिस्टन्सी हा पूरस्कार टीडीके इंडिया प्रा. लि.(नाशिक), महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड (नाशिक), लार्सन अँड टुब्रो लि.(अहमदनगर) यांनी पटकावला.

१५ वर्षापूर्वी सुरू झालेल्या स्पर्धेच्या पहिल्या संस्करणात ३० संघानी सहभाग घेतला होता आणि आज १५ व्या संस्करणात ६० कायझेन संघ सहभागी आहेत, दरवर्षी वाढत्या भागीदारीमुळे कंपन्या सतत गुणवत्ता साधनांचा अभ्यास करत आहेत, कायझेनचा संदेश महाराष्ट्राच्या शहरांत खोलवर पसरला आहे आमच्या संघटनांच्या ध्येये साध्य करण्यासाठी आणि आमच्या देशाच्या औद्योगिक विकासात योगदान देण्यास आम्हाला अशा स्पर्धांची खूप मदत होईल.
-दीपक कुलकर्णी, उत्तर महाराष्ट्र विभागीय उपाध्यक्ष,सीआयआय

जपानी व्यवस्थापन तत्त्वज्ञान असलेल्या कायझेनचा उल्लेख केला आहे, जो निरंतर वाढत्या बदलांद्वारा मोठ्या गुणवत्ता देतो. कायझेन शब्द म्हणजे सतत सुधारणा हा आहे. बरेच उद्योग कायझेन तत्त्वज्ञानाचे अनुसरण करतात, प्रत्येक वर्षी संस्थेमध्ये कायझेनची ओळख पटविली जाते. त्यांनी उद्योगाच्या वाढीस अनुकूल वातावरण निर्माण आणि टिकवून ठेवण्याच्या बाबतीत सीआयआयने विविध उपक्रमांंचे आयोजन केले जातो. महाराष्ट्रातील उद्योगांमधून मिळालेल्या प्रचंड प्रतिसादांबद्दल त्यांनी समाधान वाटले.
-अनिल जंगले,महाव्यवस्थापक महिंद्रा आणि महिंद्रा

Deshdoot
www.deshdoot.com