नांदगावला ५६ वर्षीय महिलेचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह
स्थानिक बातम्या

नांदगावला ५६ वर्षीय महिलेचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह

Abhay Puntambekar

नांदगाव । प्रतिनिधी

गेल्या ६३ दिवसापासून करोना मुक्त असलेल्या नांदगाव शहरातील प्रभाग क्रमांक सहा मधील एका ५६ वर्षीय महिलेचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असून पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आले आहे.

बाधित रुग्णांच्या संपर्कात असलेल्या त्यांच्या कुटूंबियांंसह एकूण ९ व्यक्तींची तपासणी करण्यात येऊन त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले. प्रभाग सहा मधील तीनशे मीटर भाग हा कंटेनमेंट झोन म्हणून तर पाचशे मीटर भाग हा बफर झोन म्हणून घोषित करण्यात आला .या प्रभागात येणारे व जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले आहे.

खबरदारी म्हणून आज सकाळी संपूर्ण नांदगाव शहरात रिक्षा फिरून ध्वनी क्षेपकाव्दारे नांदगावशहर बंद करण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी डॉ. श्रेया देवचके, तालुका वैद्यकीय अधिकारी अशोक ससाणे, वैद्यकीय अधिकारी डॉ. रोहन बोरसे, तहसीलदार अतुल कुलकर्णी,आदींनी शहरातील प्रभाग क्रमांक सहा मधील रुग्ण राहत असलेला परिसराला भेट देत रुग्ण राहत असलेला परिसर सील करण्यात आला . सर्वत्र निर्जंतुकीकरण, फवारणी करण्यात आली आहे.दरम्यान, नांदगाव शहरात अत्यावश्यक सेवा वगळता अन्य इतर दुकाने ३ तीन दिवसांसाठी बंद करण्यात आले आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com