Tuesday, April 23, 2024
Homeनाशिकनमस्कार करा, करोना टाळा!

नमस्कार करा, करोना टाळा!

भारतीय संस्कृतीचे प्रतीक ‘नमस्ते अभियान’ची गरज

नाशिक । प्रतिनिधी

- Advertisement -

करोनासह सर्व प्रकारच्या श्वसनापासून होणार्‍या संसर्गजन्य (व्हायरल इनफेक्शन)आजारांना सर्वात प्रभावी प्रतिबंध म्हणजे, हस्तांदोलन न करता भारतीय परंपरेनुसार हात तोडून नमस्कार करणे हा आहे. यामुळे याचा मोठा प्रसार होण्यासाठी नमस्ते अभियान सर्वांपर्यंत पोहोचण्याची आवश्यकता असल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे.

जगभरात करोनाच्या विषाणूंनी खळबळ उडवून दिली आहे. या विषाणूवर अद्याप प्रभावी औषध उपलब्ध नाही. तसेच हा संसर्गजन्य असल्याने याचा प्रसार होण्याचे प्रमाण अतिशय वेगवान आहे. प्रामुख्याने शिंक किंवा खोकल्यामुळे नाकातील द्रव उडून त्याच्या संपर्कात कोणी आल्यास त्याला या विषाणूची लागण होते. परंतु शिंकताना अगर खोकताना तोंडाला हात आडवा लावला जातो. यामुळे हे विषाणू हाताला चिकटतात. त्या व्यक्तीला दुसरे कोणी हस्तांदोलन केले तर त्याद्वारे दुसर्‍या व्यक्तीला संसर्ग होतो. हा विषाणू वेगाने पसरण्याचे प्रमुख कारण हे हस्तांदोलन असल्याचे जगभरातील निरीक्षणांमधून समोर आले आहे. जगभरात दोन व्यक्ती प्रथम भेटताच एकमेकांचे अभिवादन करण्यासाठी हस्तांदोलन केले जाते. आता मात्र हस्तांदोलन करण्याची दहशत सर्व जगभरानेच घेतली आहे. चीनसारख्या देशाने तर आता पायाने अभिवादन (लेगसेक) सारखा पर्याय निवडला आहे.

मात्र महाराष्ट्रासह भारत देशात दोन व्यक्ती भेटल्यानंतर स्वतःचे हात जोडून नमस्कार केला जातो. ही परंपरा एकमेकांचा आदरभाव राखण्यासह करोनासह इतर संसर्गजन्य आजारांचा हाताच्या स्पर्शाने होणारा प्रसार रोखण्यास अत्यंत प्रभावी ठरणारी आहे. कालौघात नमस्कार पद्धत कमी होत चालली आहे. आता करोनासारख्या विषाणूंना तोंड देण्यासाठी पुन्हा आपल्या भारतीय अभिवादनाच्या नमस्ते पद्धतीवर भर देणे व त्याचा वापर करण्यासाठी सर्वांना प्रेरित करण्याची गरज निर्माण झाली आहे. यासाठी आरोग्य विभाग, सामाजिक संस्था, शाळा, महाविद्यालये यासह प्रत्येक व्यक्तीने स्वतः नमस्ते अभियान आत्मसाद करावे तसेच इतरांना त्याचे महत्त्व पटवून द्यावा. सोशल मीडियासह सर्व पद्धतींनी त्याचा अधिकाधिक प्रचार व प्रसार करावा तसेच प्रत्येक नाशिककराने या नमस्ते अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन तज्ञ डॉक्टरांनी केले आहेत.

प्रतिबंध उत्तम
श्वसनाच्या कोणत्याही संसर्गजन्य आजाराने आजारी व्यक्तीने शिंकल्यास अगर खोकल्यास हवेत त्याच्या श्वसनातील द्रव उडतो, संबंधीत व्यक्तीच्या दोन मीटरच्या संपर्कात आपण न आल्यास संसर्ग होण्याची शक्यता नसते. परंतु हस्तांदोलन केल्यास लगेच विषाणू आपल्या हाताला चिकटून हात नाकाला अगर तोंडाला लागताच आपल्या शरीरात विषाणू प्रवेश करतात. यामुळे कोणत्याही व्यक्तीशी हस्तांदोलन करण्यापेक्षा हात जोडून नमस्कार केव्हाही श्रेष्ठच.
– डॉ. वैभव पाटील, श्वसनरोग तज्ञ

संस्काराचा भागही
नमस्कार हा आपल्या भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. सारख्या वयाच्या दोन व्यक्ती एकमेकांना भेटल्यानंतर नमस्कार घालतात. लहान व्यक्ती मोठ्या व्यक्तीला नमस्कार घातले. यामध्ये एकमेकांचा आदरयुक्त भाव व्यक्त केला जातो. तसेच थेट कोणाच्या हाताला तसेच अंगाला स्पर्श होत नाही. परिणामी कोणत्याही आजाराचा संसर्ग टळतो. यामुळे आपल्या या पद्धतीचा पुन्हा अवलंबर अधिक प्रमाणात व्हायला हवा.
– डॉ. प्रवीण खरात, फिजिशियन

टळतील हे आजार
करोना, स्वाईन फ्लू ,क्षय, सर्दी, खोकला, श्वसनाचे सर्व रोग

- Advertisment -

ताज्या बातम्या