मेशी अपघात : खा.डॉ.भारती पवार यांनी घेतली अपघातग्रस्त कुटुंबियांची व रुग्णांची भेट
स्थानिक बातम्या

मेशी अपघात : खा.डॉ.भारती पवार यांनी घेतली अपघातग्रस्त कुटुंबियांची व रुग्णांची भेट

Abhay Puntambekar

जानोरी | वार्ताहर

दिनांक २८ जानेवारी २०२० रोजी काळाने घाला घालून मेशी ता.देवळा येथे बस आणि रिक्षा अपघातात २६ प्रवास करणाऱ्या निष्पाप व्यक्तींचा मृत्यू झाला. त्यातील येसगाव ता.मालेगाव येथील मन्सुरी कुटुंबातील आठ जणांचा मृत्यू झाला तर सुर्यवंशी कुटुंबातील एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही देशभरातील सर्वात मोठी दुर्दैवी घटना घडली असून यामध्ये अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. प्रत्येक स्तरातून या गंभीर अपघाताबाबत हळहळ व्यक्त केली जात आहे.

दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या खासदार डॉ.भारती प्रविण पवार या दिल्ली येथे महत्त्वाच्या पक्षीय तथा हिवाळी बजेट अधिवेशनाकरिता गेल्या असता त्यांना अपघाताची बातमी कळताच तातडीने दिल्लीहून घटनास्थळी दाखल झाल्या व मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना भेट देत त्यांना आधार देऊन त्यांचे सांत्वन खा.डॉ.भारती पवार यांच्या कडून करण्यात आले. तसेच मालेगाव ग्रामीण रुग्णालयात जाऊन जखमींना आधार देत विचारपुस करून धिर दिला.

प्रसंगी खा.डॉ.भारती पवार यांचे समवेत शहर अध्यक्ष मदन बापु गायकवाड, मालेगाव तालुका अध्यक्ष दिपक देसले, मा.ग्रामीण जिल्हा अध्यक्ष दादा जाधव, देवळा तालुकाध्यक्ष किशोर चव्हाण, गट विकास अधिकारी देवरे आणि देशमुख, तहसिलदार शेजुळ सरपंच मोठाभाऊ शेलार, पं.स.माजी सभापती प्रतिभा पाटील, जि. प.सदस्य लकी गील, कल्पेश शेलार, विकी पाटील, दीपक जाधव, जिल्हा परिषद सदस्य यशवंत शिरसाठ, पिंपळगावचे सरपंच नदीश थोरात, दहिवड चे उपसरपंच मनीष ब्राह्मणकर, मेशी चे माजी सरपंच बापू जाधव, संजय देवरे, गणेश देवरे, दौलत थोरात आदी कार्यकर्ते, पदाधिकारी व अधिकारी वर्ग सांत्वन भेटीस उपस्थित होते.

यावेळी तहसीलदार दत्तात्रय शेजूळ, गटविकास अधिकारी राजेश देशमुख, पोलीस निरीक्षक सुहास देशमुख आदी अधिकाऱ्यांना मृतांच्या नातेवाईकांना शासकीय कामासाठी लागणारे पंचनामे, मृत्यू दाखले तसेच इतर कागदपत्रे तत्काळ उपलब्ध करून देण्याचे आदेश खा.डॉ.भारती पवार यांचेकडून देण्यात आले.

Deshdoot
www.deshdoot.com